• Download App
    बाबा रामदेव यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी, न्यायालयात याचिका दाखल । petition in muzaffarpur court demanding to file sedition case against baba ramdev

    बाबा रामदेव यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी, न्यायालयात याचिका दाखल

    baba ramdev : अ‍ॅलोपॅथी म्हणजेच मॉडर्न मेडिसिन आणि डॉक्टरांना लक्ष्य करणाऱ्या बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बाबा रामदेव यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यासाठी मुझफ्फरपूर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. petition in muzaffarpur court demanding to file sedition case against baba ramdev


    वृत्तसंस्था

    मुजफ्फरपूर : अ‍ॅलोपॅथी म्हणजेच मॉडर्न मेडिसिन आणि डॉक्टरांना लक्ष्य करणाऱ्या बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बाबा रामदेव यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यासाठी मुझफ्फरपूर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

    ज्ञान प्रकाश यांनी आपले वकील सुधीर कुमार ओझा यांच्यामार्फत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यापूर्वी अनेक राजकारणी, बॉलिवूड स्टार आणि परदेशातील हस्तींविरोधात याचिका दाखल करून ज्ञानप्रकाश चर्चेत आले होते.

    कार्यवाहक सीजेएम शैलेंद्र राय यांच्या न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून रामदेव यांचे म्हणणे फसवे असल्याचे म्हटले आहे आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याव्यतिरिक्त देशद्रोह आणि फसवणुकीसंबंधित आयपीसी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या खटल्याची पुढील सुनावणी 7 जून रोजी होईल.

    पतंजली समूहाचे संस्थापक योगगुरू रामदेव यांचे आधुनिक वैद्यकशास्त्र आणि कोरोना लसीसंदर्भातील विधान सध्या वादग्रस्त ठरलेले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) देखील रामदेवविरोधात मोर्चेबांधणी करत आहे. रामदेव डॉक्टरांची बदनामी करत असल्याचे आयएमएचे म्हणणे आहे. कोरोना काळातही अनेक डॉक्टरांनी प्राण गमावले आहेत, त्यानंतरही या पवित्र व्यवसायाला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे.

    petition in muzaffarpur court demanding to file sedition case against baba ramdev

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    BHAVY Yojana : केंद्र सरकारने भव्य योजना सुरू केली; देशभरात 100 औद्योगिक उद्याने तयार केली जातील; ₹33,660 कोटींचे बजेट मंजूर

    Delhi Gymkhana : दिल्ली जिमखाना क्लब 5 जूनपर्यंत खाली करण्याचा आदेश; केंद्राने 27.3 एकर जमीन परत मागितली; 112 वर्षांपूर्वीचा क्लब हाय-सोसायटी स्टेटसचे प्रतीक

    Sanjay Shirsat : राष्ट्रवादीबाबत वक्तव्याचा गैरअर्थ काढला:उपमुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशाचे पालन करणार- मंत्री संजय शिरसाट