”असं काय होतं त्यांच्या मोबाईलमध्ये जे त्यांना आतापर्यंत लपवावं लागत आहे?”
विशेष प्रतिनिधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंब्रिज यूनिवर्सिटीमध्ये केलेल्या वक्तव्यांवरून भाजपा संतप्त झाली आहे. भाजपा नेते आणि केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींची विधानं खोटी आणि भारताची बदनामी करणारी असल्याचं म्हटलं आहे. शिवाय राहुल गांधींना प्रत्युत्तरही दिलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले, “कालच्या निकालावरून स्पष्ट दिसते की पुन्हा एकदा काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे आणि रडण्याचे काम राहुल गांधी पुन्हा एकदा परदेशात जाऊन करत आहेत.”Pegasus is not in mobile but in Rahul Gandhi Mind They are maligning India abroad Anurag Thakur
हेरगिरीचा संशय होता तर मग पेगॅसस तपासासाठी मोबाईल का नाही दिला? –
याशिवाय अनुराग ठाकुर यांनी म्हटले की, “हे पेगॅसस कुठं दुसरीकडे नाही तर त्यांच्या(राहुल गांधी) डोक्यात बसलं आहे. काय मजबूरी होती की राहुल गांधी यांनी आपला मोबाईल पेगॅसस प्रकरणात तपासासाठी जमा नव्हता केला. ते नेते जे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामिनावर आहेत. असं काय होतं त्यांच्या मोबाईलमध्ये जे त्यांना आतापर्यंत लपवावं लागत आहे. त्यांन आणि अन्य नेत्यांनी का नाही मोबाईल जमा केले?”
किमान इटलीच्या पंतप्रधानांचं तरी राहुल गांधींन ऐकलं पाहिजे –
काँग्रेसवर टीका करताना अनुराग ठाकूर यांनी म्हटले की, ‘’जगभरात मोदीच्या नेतृत्वात भारताचा सन्मान वाढला आहे. त्यांना जागतिक स्तरावरील नेतृत्व म्हटलं जात आहे. राहुल गांधींनी कुणाचं नाहीतर किमान इटलीच्या पंतप्रधानांचं तरी ऐकायला हवं होतं. इटलीच्या पंतप्रधानांनी सांगितलं हे की, जगभरात मोदींनी जे प्रेम मिळत आहे, ज्याप्रकारे ते जगाचे लोकप्रिय नेते म्हणून पुढे येत आहेत. ते आज एक मोठे नेते आहेत. हे कदाचित राहुल गांधी आणि काँग्रेसला मान्य करता येत नाही.’’
याशिवाय, सातत्याने खोटे बोलणे, परदेशी भूमीचा आणि परदेशी मित्रांचा, परदेशी यंत्रणांचा वापर करणे व भारताची बदनामी करणे ही राहुल गांधींची सवय झाली आहे. राहुल गांधींच हा द्वेष पंतप्रधानांबाबत तर असू शकतो, मात्र देशाला बदनाम करण्याचे षडयंत्र जे ते परदेशी भूमीवरून, परदेशी मित्रांच्या माध्यमातून करत आहेत, त्यावरून असा प्रश्न निर्माण होतो की काँग्रेसचे नेमके धोरण काय आहे? अशी टीकाही अनुराग ठाकूर यांनी केली.
निवडणूकांचे निकाल स्वीकारणं राहुल गांधींना अवघड जातय –
ईशान्य भारतातील निवडणूकांचे निकाल कदाचित राहुल गांधींना अगोदरच माहीत होते. मात्र आता त्यांना जनादेशाचा स्वीकार करणे अवघड जात आहे. कदाचित ते सलगचा पराभवही स्वीकार करू शकत नाहीत. कालच्या निकालावरून हे स्पष्ट झालं आहे की जनता वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवत आहे.
Pegasus is not in mobile but in Rahul Gandhi Mind They are maligning India abroad Anurag Thakur
महत्वाच्या बातम्या
- मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला, मॉर्निंग वॉकवेळी लोखंडी रॉड, स्टम्पने मारहाण; रुग्णालयात दाखल
- 5 राज्यांतील पोटनिवडणुकीचे निकाल : काँग्रेसने 6 पैकी 3 जागा जिंकल्या, महाराष्ट्रातील कसबापेठची जागा 28 वर्षांनंतर भाजपने गमावली
- लोकसभा निवडणूक एकट्याने लढवणार TMC : विरोधी ऐक्याच्या प्रचाराला सुरुंग, ममता म्हणाल्या- आमची आघाडी जनतेशीच
- “पूर्वोत्तर अब ना दिल से और ना ही दिल्ली से दूर” तीन राज्यांच्या निवडणूकीत भाजपाच्या घवघवीत यशानंतर पंतप्रधान मोदींचे विधान!