• Download App
    Parliament on April 16 to increase women's reservation and Lok Sabha seats; Revolutionary step by Modi government!! महिला आरक्षण आणि लोकसभेच्या जागा वाढविण्यासाठी १६ एप्रिलला संसदेचे विशेष अधिवेशन; मोदी सरकारचे क्रांतिकारक पाऊल!!

    महिला आरक्षण आणि लोकसभेच्या जागा वाढविण्यासाठी १६ एप्रिलला संसदेचे विशेष अधिवेशन; मोदी सरकारचे क्रांतिकारक पाऊल!!

    Modi government

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्रातल्या मोदी सरकारने एक क्रांतिकारक पाऊल टाकून महिला आरक्षण आणि लोकसभेच्या जागा वाढविण्यासाठीचे घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलविले आहे. १६ ते १८ एप्रिल २०२६ दरम्यान संसदेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. Parliament on April 16 to increase women’s reservation and Lok Sabha seats; Revolutionary step by Modi government!!

    या अधिवेशनाचा मुख्य उद्देश महिला आरक्षण कायद्याच्या (नारी शक्ती वंदन अधिनियम) अंमलबजावणीशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयके मंजूर करणे हा आहे.



    अधिवेशनाची प्रमुख वैशिष्ट्ये

    – महिला आरक्षण कायद्याची अंमलबजावणी लवकर करण्यासाठी आवश्यक असणारी घटनादुरुस्ती विधेयके मांडणे, हा या विशेष अधिवेशनाचा प्रमुख अजेंडा आहे.

    लोकसभेच्या जागांमध्ये वाढ  

    या अधिवेशनात लोकसभेच्या जागा ५४३ वरून वाढवून ८१६ (२७३ महिलांसाठी आरक्षित) करण्यासंबंधीच्या प्रस्तावावर चर्चा व मंजुरी अपेक्षित आहे.

    लोकसभेच्या मतदारसंघाची पुनर्रचना : महिला आरक्षण लागू करण्यासाठी मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation) करणे आवश्यक आहे, जी २०११ च्या जनगणनेवर आधारित असण्याची शक्यता आहे.

    उद्देश : महिला आरक्षण कायदा लागू करणे आणि पुढील लोकसभेच्या जागांमध्ये महिलांसाठी एक तृतीयांश जागा आरक्षित करणे यामुळे शक्य होणार आहे.

    काँग्रेस सगळ्या विरोधकांनी मात्र मोदी सरकारच्या या क्रांतिकारक पावलाला विरोध केला आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात सगळे विरोधी पक्ष भाग घेणार आहेत पण मोदी सरकार मांडणार असलेल्या घटना दुरुस्ती विधेयकांना ते विरोध करणार आहेत. तरी देखील लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये मोदी सरकारकडे पुरेसे बहुमत असल्याने घटनादुरुस्ती विधेयके मंजूर होण्यामध्ये विरोधक फारसे अडथळे आणू शकणार नाहीत. कारण विरोधकांकडे खासदारांचे तेवढे संख्याबळ नाही.

     Parliament on April 16 to increase women’s reservation and Lok Sabha seats; Revolutionary step by Modi government!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    तामिळनाडू आणि बंगाल मध्ये तुफानी जागतिक विक्रमी मतदान; त्या तुलनेत बारामती आणि राहुरीत मतदारांची मतदानाकडे पाठ!!

    ATF Rules : सरकारने एव्हिएशन इंधनात इथेनॉल मिश्रणाला मंजुरी दिली; कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होईल; गडकरी म्हणाले-100% मिश्रणाचे लक्ष्य

    Online Gaming : ऑनलाइन गेमिंगचे नवीन नियम 1 मे पासून लागू होतील; गेमिंग-प्रमाणपत्र 10 वर्षांपर्यंत वैध राहील; पैसे नसलेल्या गेम्सना नोंदणीतून सूट