• Download App
    भारताच्या मदतीला धावून येणाची पाकिस्तानची इच्छा, व्हेंटिलेटर, पीपीई किट देण्याची तयारी|Pakistan wants to help for India

    भारताच्या मदतीला धावून येणाची पाकिस्तानची इच्छा, व्हेंटिलेटर, पीपीई किट देण्याची तयारी

    विशेष प्रतिनिधी 

    इस्लामाबाद : पाकिस्तानमधील अनेक राजकीय नेत्यांनी, खेळाडूंनी ट्विटरच्या माध्यमातून भारतातील रुग्णांसाठी प्रार्थना केली आहे. #pakistanstandwithindia या हॅशटॅगच्या माध्यमातून अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.Pakistan wants to help for India

    ही वेळ एकमेकांना मदत करायची आहे, असे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने म्हटले आहे.भारत अभूतपूर्व संकटाचा सामना करत असल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननेही भारताला मदत करण्याची तयारी दर्शविली आहे.



    भारताला व्हेंटिलेटर आणि इतर साहित्य पुरविण्यास तयार असून एकमेकांना सहकार्य करून जागतिक साथीने निर्माण केलेले आव्हान पार करू, असे पाकिस्तानने म्हटले आहे.

    पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध करत भारताला मदतीची तयारी दर्शविली आहे. व्हेंटिलेटर, पीपीई किट, डिजीटल एक्स रे यंत्र असे साहित्य पुरविता येईल, असे या निवेदनात म्हटले आहे.

    पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्वीट करत मदतीची तयारी दर्शविल्यानंतर त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन प्रसिद्ध केले. ‘जागतिक संकटाचा एकत्र येऊन सामना करत मानवतेची रक्षा करायला हवी. या संकटात आम्ही भारतीयांच्या सोबत आहोत,’ असे इम्रान खान यांनी ट्वीट केले आहे.

    Pakistan wants to help for India

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र