वृत्तसंस्था
संयुक्त राष्ट्र संघ : पाकिस्तान दहशतवादाचा बळी ठरल्याचा कांगावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्राच्या संघाच्या आमसभेच्या केला होता. त्यांनी तेरा वेळा काश्मीर प्रश्नाचा उल्लेख करून पाकिस्तानचा काश्मीरवर असलेला दावा मजबूत करण्याचा प्रयत्न केला. परंतु इम्रान खान यांच्या कांगाव्याला आज भारताने खणखणीत शब्दात प्रत्युत्तर दिले. Pakistan claims to be a victim of terrorism, but in reality it is the next country; India knocked at the United Nations
भारताच्या संयुक्त राष्ट्र संघातील फर्स्ट सेक्रेटरी स्नेहा दुबे यांनी “राइट टू रिप्लाय” या कलमाअंतर्गत पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. त्या म्हणाल्या, की आपण दहशतवादाचा बळी ठरले असल्याचा पाकिस्तानचा कांगावा आहे. पण प्रत्यक्षात तोच देश आगलाव्या आहे.
दहशतवादाशी मुकाबला करण्याची पाकिस्तानची तोंडी भाषा आहे, पण प्रत्यक्षात पाकिस्तानची कृती सर्व प्रकारच्या दहशतवादाला खतपाणी घालण्याची आहे. किंबहुना पाकिस्तानच खऱ्या अर्थाने दहशतवादाचा जनक आहे. दहशतवादाची सगळी आग जगभरात पेटवणारा तो आगलाव्या देश आहे, अशा शब्दात स्नेहा दुबे यांनी पाकिस्तानला ठणकावले.
इमरान खान यांनी आपल्या भाषणात तेरा वेळा काश्मीर प्रश्नाचा उल्लेख केला होता. यासंदर्भात भारताची भूमिका स्पष्ट करताना स्नेहा दुबे म्हणाल्या, की काश्मीर हा भारताचा अंतर्गत भाग आहे. ही कायद्याने सिद्ध झालेली गोष्ट आहे. तो भारताचा अंतर्गत भाग होता, आहे आणि राहील याविषयी कोणीही शंका बाळगता कामा नये. उलट पाकिस्ताननेच काश्मीरच्या काही भागावर बेकायदेशीररित्या कब्जा केला आहे. तो त्याने ताबडतोब मोकळा करावा अशी आमची संयुक्त राष्ट्रसंघाच्या फोरम वरून मागणी आहे, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
Pakistan claims to be a victim of terrorism, but in reality it is the next country; India knocked at the United Nations
महत्त्वाच्या बातम्या
- पुण्यातील निर्बंध ऑक्टोबरपासून शिथिल; पालकमंत्री अजित पवार यांचे कोरोना आढावा घेतल्यावर संकेत
- सबका साथ, सबका विकास, आत्मनिर्भरता, स्टार्ट अप्स, स्किल डेव्हलपमेंट संकल्पनांची मूळे दीनदयाळजींच्या “सबको काम” अर्थनीती मध्ये!!
- मार्क्सवाद्यांनी अनन्वित अत्याचार केले, त्यांच्यावर कधी सोडली का सीबीआय!!; ममतांचा भाजपला टोला
- WOMEN IN NDA : एनडीए प्रवेशासाठी UPSC ने महिला उमेदवारांकडून मागविले अर्ज