• Download App
    कोलकात्यातल्या भाजपा कार्यालयाजवळ सापडले 50 क्रुड बॉम्ब।Over 50 crude bombs recovered near BJP office in Mamata's West Bengal; Political vendetta killing BJP workers

    कोलकात्यातल्या भाजपा कार्यालयाजवळ सापडले 50 क्रुड बॉम्ब

    पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर ममता बॅनर्जींच्या समर्थकांनी घातलेला धुमाकूळ अद्याप शमलेला नाही. राजकीय विरोधकांना रक्तरंजित पद्धतीने संपवण्यासाठी, दहशत, गुंडागर्दी करुन राजकीय विरोधकांना धमकवण्याची परंपरा पश्चिम बंगालच्या राजकारणात आहे. डाव्या पक्षांनी वर्षानुवर्षे जी रणनिती अवलंबली तोच रक्तरंजित मार्ग ममता बॅनर्जी पुढे नेताना दिसत आहेत. Over 50 crude bombs recovered near BJP office in Mamata’s West Bengal; Political vendetta killing BJP workers


    वृत्तसंस्था

    कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयापासून अवघ्या वीस मीटर अंतरावर 50 पेक्षा जास्त क्रुड बॉम्ब शनिवारी रात्री आढळून आले. निवडणूक प्रचारादरम्यान भाजपाविरोधात यांचा वापर होणार होता अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. पश्चिम बंगालचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या मते निवडणूत पश्चात हिंसाचारात भाजपाच्या 37 कार्यकर्त्यांची हत्या आत्तापर्यंत झाली आहे.

    फळांच्या पोत्यांमध्ये हे बॉम्ब भरून ठेवले होते. या बॉम्बची माहिती मिलिटरी इंटेलिजन्सकडून देण्यात आली. या सगळ्या बॉम्बचा धमाका झाला असता तर त्यात भयानक जीवीत आणि वित्तहानी झाली असती असे सूत्रांनी सांगितले. कोलकाता पोलिसांनी भाजपा कार्यालयाजवळच्या परिसरातून हे बॉम्ब ताब्यात घेतले. विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपाने या कार्यालयाचा वापर केला होता.

    स्थानिक पोलिसांनी सांगितले की, फळे भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चार गोण्यांमध्ये हे बॉम्ब भरुन ठेवले होते. मिलिटरी इंटेलिजन्सकडून यासंबंधीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शोध घेतला. स्थानिक पोलिसांच्या दंगलविरोधी कृती दलाने भाजपा कार्यालाच्या आसपासच्या परिसरात तपास केला. नंतर बॉम्बशोध पथकाने हे बॉम्ब निकामी केले. हे बॉम्ब या ठिकाणी कसे आले याचा तपास आता कोलकाता पोलिसांनी चालू केला आहे. त्यासाठी या परिसरातल्या सीसीटीव्हींच्या फुटेजची मदत घेतली जात आहे.



    गेल्याच महिन्यात बीरभूम जिल्ह्यात अकरा वर्षीय मुलाचा क्रुड बॉम्बच्या स्फोटात मृत्यू झाल्याची घटना पश्चिम बंगालमध्ये घडली. खातीपूर गावात एका कालव्याजवळ खेळत असलेल्या या मुलाने चुकून एका खोक्याला हात लावला आणि त्यावेळी क्रुड बॉम्बचा स्फोट झाला. यासारख्याच अनेक हिंसक घटना गेल्या महिन्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी घडल्या. भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांचे खून पाडण्यात आले. अनेकजण बेदम मारहाणीत गंभीर जखमी झाले. तर दहशतीमुळे गावं सोडून जाण्याची पाळी तृणमूल कॉंग्रेसच्या हजारो राजकीय विरोधकांवर आली. पश्चिम बंगालमधल्या या राजकीय गुंडगिरीबाबत भाजपाने सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसला जबाबदार धरले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनांमागे हिंदुत्त्ववादी भाजपाचा हात असल्याचा आरोप केला आहे.

    Over 50 crude bombs recovered near BJP office in Mamata’s West Bengal; Political vendetta killing BJP workers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!