• Download App
    बंगालमध्ये विरोधकांना मतदान केल्याची शिक्षा मिळत आहे, राज्यपाल धनखड यांचे ट्वीट । West Bengal Violence Governor jagdeep Dhankar Tweet says its Shame to humanity

    बंगालमध्ये विरोधकांना मतदान केल्याची शिक्षा मिळत आहे, राज्यपाल धनखड यांचे ट्वीट

    पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे, परंतु इथला हिंसाचार थांबण्याचे नाव नाही. ट्वीटमध्ये राज्यपाल जगदीप धनखड म्हणाले की, राज्यात मतदानानंतरचा हिंसाचार अजूनही सुरू आहे, हे माणुसकीला काळिमा फासणारे आहे. यासोबतच त्यांनी नुकसान झालेल्या घरांचे काही व्हिडिओ आणि छायाचित्रेही शेअर केली आहेत. ते म्हणाले की, पोलिस तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत. West Bengal Violence Governor jagdeep Dhankar Tweet says its Shame to humanity


    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे, परंतु इथला हिंसाचार थांबण्याचे नाव नाही. ट्वीटमध्ये राज्यपाल जगदीप धनखड म्हणाले की, राज्यात मतदानानंतरचा हिंसाचार अजूनही सुरू आहे, हे माणुसकीला काळिमा फासणारे आहे. यासोबतच त्यांनी नुकसान झालेल्या घरांचे काही व्हिडिओ आणि छायाचित्रेही शेअर केली आहेत. ते म्हणाले की, पोलिस तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत.्र

    एकापाठोपाठ एक ट्विट करून राज्यपाल जगदीप धनखड यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी ट्वीट करून लिहिले की, “मतदानानंतरचा हिंसाचार अजूनही सुरू आहे, हे माणुसकीला लाज आणणारे आहे. राज्य पोलीस तोडफोडीत सामील झालेल्यांना प्रोत्साहन देत आहेत. लोकशाहीमध्ये विरोधकांना मत देण्याची हिम्मत करणार्‍यांसाठी ही ‘शिक्षा’ आहे.

    पुढच्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले की, हिंसाचाराची सर्व माहिती डीजीपींना दिली गेली आहे. त्यांनी लिहिले, “आशा आहे की सद्भावना कायम राहील आणि कायदा व सुव्यवस्था पूर्ववत होईल. अन्यथा कदाचित लोकशाही कायमची धोक्यात येईल.” पुढील ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, अशा विनाशात पीडितांना कोणताही दिलासा मिळत नाहीये. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना टॅग करताना त्यांनी लिहिले की, अधिकाऱ्यांनी जागे होणे आणि कायद्यानुसार आपले कर्तव्य बजावण्याची वेळ आली आहे.

    वास्तविक, बंगालमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल 2 मे रोजी जाहीर करण्यात आले. तेव्हापासून येथे हिंसाचाराचे सत्र सुरू झाले. बर्‍याच लोकांनी आपले प्राणही गमावले आहेत. हिंसाचारामुळे लोकांना बंगालमधून स्थलांतर करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोपही विरोधकांनी यापूर्वी केला आहे.

    West Bengal Violence Governor jagdeep Dhankar Tweet says its Shame to humanity

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    लोकसभेला फिस्कटले तरी प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेसाठी आघाडीचा काँग्रेसला नवा प्रस्ताव!!

    मणिपूरमध्ये सीआरपीएफचे 2 जवान शहीद; कुकी अतिरेक्यांनी मैतेई गावात सेंट्रल फोर्स पोस्टवर बॉम्ब फेकले, 2 जवान जखमी

    सुप्रीम कोर्टात याचिका- NOTA ला जास्त मते पडल्यास निवडणूक रद्द करावी; निवडणूक आयोगाला नोटीस