• Download App
    Opposition's nonworkeble strategy to encircle other ministers than nitin gadkari

    म्हणे, गडकरी सोडून इतर मंत्र्यांना घेरण्याची विरोधकांची रणनीती; पण असल्या बातम्यांची “रणभेरी” वाजवून “रणनीती” यशस्वी ठरते का??

    मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलायला भागच पाडायचे, या हेतूने केंद्रातील मोदी सरकारवर अविश्वास ठराव आणल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोडून इतर सर्व मंत्र्यांना घेरण्याची I.N.D.I.A आघाडीने रणनीती तयार केली असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. Opposition’s nonworkeble strategy to encircle other ministers than nitin gadkari

    पण असल्या “बातम्यांच्या रणभेरी” वाजवून मूळात कोणती “रणनीती” ठरते का?? आणि ती ठरलीच, तर तिला “रणनीती” तरी म्हणता येईल का??आणि “रणभेरी” वाजवणारी ही “रणनीती” यशस्वी ठरेल का??, हे साधे प्रश्नही तसल्या बातम्या देणाऱ्या मराठी माध्यमांना पडले नाहीत!!… धन्य ती I.N.D.I.A आणि धन्य ती त्यांची समर्थक माध्यमे!!

    मणिपूर वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलायला भाग पाडण्यासाठी म्हणे, I.N.D.I.A आघाडीने अविश्वास ठरावाचे संसदीय हत्यार वापरले. मोदी सरकारकडे प्रचंड बहुमत असताना हे संसदीय हत्यार किती बोथट आहे, हे 2018 मध्येच दिसले होते. त्याचवेळी मोदींनी 2023 मध्ये भरपूर तयारी करून तुम्ही अविश्वास ठराव आणा, असे आव्हान दिले होते. पण मोदींची ती भविष्यवाणी, त्यांच्या ज्योतिष विषयक ज्ञानाने नव्हे, तर विरोधकांच्या राजकीय (अ)कर्तृत्वाने सिद्ध झाली!! विरोधकांनी खरंच अविश्वास ठरावाचे बोथट संसदीय हत्यार पुन्हा वापरले. आता त्या ठरावाचे काय होणार?, हे सांगायला फार मोठ्या ज्योतिषाची गरज नाही.

    पण दरम्यानच्या काळात म्हणे, I.N.D.I.A आघाडीने एक खूप मोठी “रणनीती” ठरवली, ती म्हणजे मोदी मंत्रिमंडळातील नितीन गडकरी यांच्यासारख्या मंत्र्यांना वगळून संसदेत इतर मंत्र्यांना घेरायचे. गडकरी भाषण करत असतील किंवा कोणत्या प्रश्नाचे उत्तर देत असतील, तर शांत बसायचे आणि इतर कोणीही मंत्री भाषण करू लागला अथवा उत्तरे देऊ लागले की गदारोळ करायचा ही म्हणे विरोधकांची “रणनीती” आहे.


    मणिपूरमध्ये 83 दिवसांनंतर इंटरनेट बहालीचे आदेश, ब्रॉडबँड सेवा अटींसह उपलब्ध होणार


    पण मराठी माध्यमांनी पण या “रणनीतीची” आधीच “रणभेरी” वाजवून पुरती “टिमकी” करून टाकली आहे. असल्या “रणभेरी” वाजवून कुठली “रणनीती” ठरत असते का?? आणि ती “रणनीती” ठरलीच तर ती यशस्वी तरी होत असते का?? एवढा साधा प्रश्नही ही कथित “रणनीती” तयार करणाऱ्यांना आणि तिची बातमी देणाऱ्यांना पडला नाही!! यातच मोदीविरोधकांचे अपयश आणि मोदींचे यश दडले आहे.

    गडकरींना न घेरता काय साध्य होणार??

    पण त्या पलीकडे जाऊन एकट्या गडकरींना घेरायचे नाही आणि बाकीच्यांना घेरायचे असली “रणनीती” वापरून मोदी – शाहांचे सरकार अडचणीत येईल!!, अशी शक्कल ज्याला लढवावी वाटली, त्याची “राजकीय अक्कल” किती आहे, हे देखील पुरते “एक्सपोज” झाले आहे.

    ही खरी विरोधकांची भंबेरी

    विरोधी I.N.D.I.A आघाडीने गडकरींना न घेरून नितीन गडकरी अडचणीत येतील की मोदी अडचणीत येतील?? आणि मूळात विरोधकांच्या रणनीतीनुसार नितीन गडकरी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना अडचणीत आणतील, हे विरोधकांना वाटूच कसे शकते?? असे वाटणाऱ्या विरोधकांची राजकीय बुद्धिमत्ता किती आहे हेच रणनीतीच्या बातमीतून “एक्सपोज” होत आहे. नितीन गडकरी हे काय विरोधकांच्या हातातले राजकीय खेळणे बनणारे नेते आहेत काय??… ते विरोधकांची कथित रणनीती ओळखू शकत नाहीत का??… विरोधकांच्या रणनीतीनुसार वागायला गडकरी काल-परवा राजकारणात आले आहेत का??, एवढे साधे प्रश्न विरोधकांच्या “रणनीतीकारांना” पडत नाहीत!!… पण गडकरींना न घेरता, बाकीच्या मंत्र्यांना घेरायची ही म्हणे विरोधकांची “रणनीती” आहे… ज्याची “रणभेरी” माध्यमांनी आधीच वाजवून त्या “रणनीतीची” आधीच “टिमकी” केली आहे. याचा खरा अर्थ विरोधकांची भंबेरी उडाली आहे!!

    Opposition’s nonworkeble strategy to encircle other ministers than nitin gadkari

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य