विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात लोकशाही संविधान वाचविण्यासाठी आणि महागाई बेरोजगारीच्या समस्यांवर झुंजण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. हे विचार काँग्रेस पक्षाचे आहेत आणि त्याला शरद पवारांची सहमती आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आजच्या बैठकीनंतर केले.Opposition leaders spoke of unity, but the actions speak different
या वक्तव्याला खुद्द राहुल गांधी यांनीही दुजोरा दिला. विरोधकांच्या ऐक्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ती निरंतर सुरू राहील, असे खर्गेजी आणि पवार साहेब म्हणाले आहेत. त्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले. यातून सर्व विरोधकांच्या तोंडी आता एकीची भाषा समानतेने येऊ लागली आहे, हे खरे पण मूळ मुद्दा हा आहे की मग बेकी तयार तरी का होते आहे??, या प्रश्नाचे उत्तर यापैकी कोणाही नेत्याने दिलेले नाही.
काल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी राहुल गांधी, खर्गे यांच्याशी सकाळी चर्चा केली. त्यावेळी त्यांच्या समवेत बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष लल्लनसिंह होते. सायंकाळी हे सर्व नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचले. तेथे विरोधी ऐक्या बाबत या सर्वांची चर्चा झाली आणि आज सायंकाळी शरद पवार मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी पोहोचले. तेथे त्यांनी राहुल गांधी, खर्गे आणि काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत शिवसेनेचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते.
मतभेदांवर चर्चा झाली का??
या सर्व बैठकांच्या मध्ये सर्व विरोधी नेत्यांच्या तोंडी एकीची भाषा जरूर आली. पण राहुल गांधींनी केलेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान, त्यांनीच उपस्थित करून लावून धरलेला अदानी मुद्दा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी तसेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वर विरोधकांनी एकत्रितरीत्या केलेला हल्लाबोल या चार मुद्द्यांवर विरोधकांचे वेगवेगळे सूर उमटले होते. त्या मुद्द्यांबाबत या बैठकीत काही चर्चा झाली का??, या विषयावर मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार अथवा राहुल गांधी यापैकी कोणीही बोलले नाही. त्यामुळे कालच्या नितीश कुमार यांच्या विरोधी ऐक्याच्या बैठकीचे आजची शरद पवार खर्गे आणि राहुल गांधी यांची बैठक हे फक्त एक्सटेन्शन होते का??, हा सवाल तयार झाला आहे.
Opposition leaders spoke of unity, but the actions speak different
महत्वाच्या बातम्या
- काश्मिरात एक लाखाहून जास्त काश्मिरी पंडित होणार मतदार, भाजपने म्हटले- काश्मिरी पंडितांना लोकशाही अधिकार देण्याच्या दिशेने मोठे पाऊल
- कर्नाटकात भाजपची 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, त्यात 2 महिलांचा समावेश; 7 विद्यमान आमदारांची तिकिटे कापली
- स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वंशजांनी राहुल गांधींविरोधात दाखल केला मानहानीचा खटला
- ‘’मग Penguin आणि UTने सालियानच्या केसच्या भितीने…’’; नितेश राणेंनी साधला निशाणा!