नाशिक : पहलगाम मधल्या जदहशतवादी हल्ल्याचा भारताने अखेर सूड उगवलाच. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकच्या वेळी भारताने फक्त पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधल्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले केले होते. पण यावेळी मात्र “पीन पॉईंट प्रिसिजन स्ट्राईक” करताना पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील 4 आणि प्रत्यक्ष पाकिस्तान मधील 5 शहरांमधल्या दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करून भारताने आपली संहारक मारक क्षमता पाकिस्तानी राज्यकर्त्यांना दाखवून दिली.
पण हे असले तरी प्रत्यक्षात “ऑपरेशन सिंदूर” इतर केवळ सुरुवात असून अजून बरेच काही बाकी आहे, असा स्पष्ट संदेशच नव्या भारताने पाकिस्तानी राज्यकर्त्यांना दिला. कारण ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये लाईन ऑफ कंट्रोल वर प्रत्येक ठिकाणी शस्त्र संधीचे उल्लंघन करून तुफान गोळीबार केला त्याला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी पंतप्रधानांनी प्रथमच “प्रिसिजन स्ट्राईकच्या” रात्रीच भारताने हल्ला केल्याचे मान्य केले. पाकिस्तानी लष्कराने त्याचे तपशील सादर केले. भारताने सहा ठिकाणांवर 24 मिसाईल्स डागली, अशी कबुली दिली. पण भारताने आठ पाकिस्तानी नागरिक मारले आणि 35 नागरिक जखमी केले अशी बोंबाबोंब केली.
प्रत्यक्षात भारताने बहावलपूर, मुरिदके, सियालकोट, मुजफ्फराबाद, कोटली, गुलपूर, चक अमरू, भिमबेर इथल्या दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करून ती उद्ध्वस्त केली. लष्कर ए तोयबा, हिजबुल मुजाहिदिन आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांचे म्होरके मारले. भारतीय सैन्य दलाने अद्याप किती दहशतवादी मारले याचा अधिकृत आकडा जाहीर केलेला नाही. मात्र 80 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेल्याचा अंदाज रिटायर्ड कॅप्टन अनिल गौर यांनी व्यक्त केला.
पण असे असले तरी प्रत्यक्षात भारताने फक्त दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले. स्वतः निवडलेले टार्गेट पूर्ण केले. सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी सैन्यदल यांना टार्गेट केले नाही, असे भारतीय सैन्य दलाने स्पष्ट केले. यातूनच भारताने पाकिस्तानला आणि सगळ्या जगाला स्पष्ट संदेश दिला. भारताने दहशतवाद्यांना “शिक्षा” केली आहे. ती मुळातच पाकिस्तानने करणे अपेक्षित होते. परंतु पाकिस्तानने तशी शिक्षा न केल्याने भारताला त्या दहशतवाद्यांना “शिक्षा” करावी लागली. इथून पुढे या दहशतवाद्यांच्या “मालकांना” “शिक्षा” करू हा तो संदेश आहे.
त्या पलीकडे जाऊन भारताने पश्चिम सीमेवर हवाई दल सज्ज ठेवले असून पाकिस्तान कुठलीही आगळीक करणार असेल तर त्याला जागीच ठेचायचे प्रत्युत्तर देण्याच्या दृष्टीने पूर्ण तयारी केली आहे. ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः काल रात्रीपासून लक्ष ठेवून होते. ते ऑपरेशन मध्यरात्री पूर्ण झाले. त्यानंतर पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतात लगेच आणीबाणी जाहीर झाली. लाहोर, सियालकोटचे विमानतळ बंद झाले. भारताने देखील उत्तर भारतातली नागरी हवाई सेवा तात्पुरती बंद केली. त्याचवेळी भारतीय हवाई दलाची सर्व विमाने आणि विमानतळ ठेवली. त्यामुळेच ऑपरेशन सिंदूर ही पाकिस्तान वरच्या कारवाईची सुरुवात असून पुढे बरीच लष्करी कारवाई बाकी आहे, असेच यातून भारतीय सैन्य दलाने सूचित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी अकरा वाजता डिलीट कमिटी ऑन सिक्युरिटी अफेयर्सची बैठक बोलावली असून त्यात पुढची रणनीती ठरविली जाणार आहे.
Operation sindoor just a beginning lot more yet to come
महत्वाच्या बातम्या
- प्रो रेसलिंग प्रकारात भारताला ‘रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनियामुळे स्वतःचे व्यासपीठ उपलब्ध’
- Harshvardhan Sapkal बीडच्या बदनामीचे चित्र बदलून सामाजिक सद्भाव वाढीस जावा: हर्षवर्धन सपकाळ यांची अपेक्षा
- Tejashwi Yadav : आता तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र!
- Ganga Expressway : हवाई दलाने रचला विक्रम : गंगा एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानांचे रात्रीचे लँडिंग