विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद, हिजबुल मुजाहिदिन आणि लष्कर ए तोयबा यांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच पाकिस्तानात तब्बल 9 ठिकाणी मिसाईल हल्ले केले. बहावलपूर, मुरिदके, मुजफ्फरखबाद, कोटली, सियालकोट आदी शहरांमध्ये दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. मध्यरात्री 1.30 केलेल्या या हल्ल्यांमध्ये भारतीय सैन्य दलाने लष्कर, हवाई दल आणि नौदल यांचा वापर करून फक्त दहशतवादी अड्डेच टार्गेट केले. पाकिस्तानी नागरी वस्त्या किंवा पाकिस्तानी सैन्य दलाच्या कुठल्याही ठिकाणांना टार्गेट केले नाही.
भारताने केलेल्या या हल्ल्याची माहिती भारतीय प्रतिनिधींनी अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, सौदी अरेबिया या देशांना दिली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकन संरक्षण मंत्र्यांशी चर्चा केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला अनुकूल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. पण त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सध्याचा संघर्ष लवकर संपेल, असा आशावाद व्यक्त केला.
पाकिस्तानात दहशतवादी अड्डे चालवून भारतात वेगवेगळे दहशतवादी हल्ले करणाऱ्या लष्कर ए तोयबा, हिजबुल मुजाहिदिन आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच भारताने “प्रिसिजन स्ट्राईक” केले. त्यासाठी नेमकेपणाने टार्गेट निवडले आणि तिथेच मिसाईल्स डागली.
पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदू पुरुषांना गोळ्या घातल्या. जा तुमच्या मोदीला सांगा असे दहशतवाद्यांनी तिथल्या महिलांना सांगितले. त्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्य दलाने सैनिकी कारवाईचे नाव “ऑपरेशन सिंदूर” ठेवले.
आधीच्या सर्जिकल स्ट्राईक आणि आत्ताच्या प्रिसिजन स्ट्राईक यांच्यातला फरक असा की सर्जिकल स्ट्राईक झाल्याचे पाकिस्तानने मान्य केले नव्हते. त्यावेळचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सर्जिकल स्ट्राईक नाकारले होते. पण यावेळी पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी भारताने 5 शहरांवर “प्रिसिजन स्ट्राईक” केल्याचे मान्य केले. भारताने केलेल्या हल्ल्याला पाकिस्तान चोख प्रत्युत्तर देईल, असा दावा त्यांनी केला.
पाकिस्तानी लष्कराने भारतीय हल्ल्याची कबुली दिली असून भारताने 6 ठिकाणी हल्ले केले. 24 मिसाईल्स डागली. त्यात आठ पाकिस्तानी नागरिक नागरिक ठार झाले तर 35 जण जखमी झाले, असा दावा केला. प्रत्यक्षात भारताने दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले करून तिथले दहशतवादी मारले. पण भारताने पाकिस्तानी नागरिक मारल्याची बोंबाबोंब पाकिस्तानी लष्कराने केली.
Operation Sindoor : India attack on pakistan
महत्वाच्या बातम्या
- प्रो रेसलिंग प्रकारात भारताला ‘रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनियामुळे स्वतःचे व्यासपीठ उपलब्ध’
- Harshvardhan Sapkal बीडच्या बदनामीचे चित्र बदलून सामाजिक सद्भाव वाढीस जावा: हर्षवर्धन सपकाळ यांची अपेक्षा
- Tejashwi Yadav : आता तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र!
- Ganga Expressway : हवाई दलाने रचला विक्रम : गंगा एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानांचे रात्रीचे लँडिंग