• Download App
    पंतप्रधान मोदींच्या भेटीत फक्त कोविड आणि बंगालच्या नामांतराची चर्चा : ममता बॅनर्जी|Only Kovid and Bengal renaming discussed during PM Modi's visit: Mamata Banerjee

    पंतप्रधान मोदींच्या भेटीत फक्त कोविड आणि बंगालच्या नामांतराची चर्चा ; ममता बॅनर्जी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राजधानी दिल्लीत जरी सर्व विरोधी पक्षांची मोट बांधायला आल्या असल्या तरी त्यांनी आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 7 लोक कल्याण मार्ग या पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ही भेट फक्त सौजन्य भेट होती. यामध्ये राजकीय चर्चा झाली नाही, असे ममता बॅनर्जी यांनी भेटीनंतर पत्रकारांना सांगितले.Only Kovid and Bengal renaming discussed during PM Modi’s visit: Mamata Banerjee

    पश्चिम बंगालमधील कोविड परिस्थिती आणि राज्याच्या नामांतराचा विषय आपण पंतप्रधानांची झालेल्या चर्चेत उपस्थित केल्याचे त्या म्हणाल्या. पश्चिम बंगालला कोविड प्रतिबंधक लसी ज्यादा देण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी पंतप्रधानांकडे केली.



    पश्चिम बंगाल या राज्याचे “बांगला” असे नामांतर करण्याचा ठराव गेल्याच विधानसभेत करण्यात आला होता. परंतु केंद्र सरकारच्या मंजुरीविना तो अडलेला आहे. केंद्र सरकारने या नामांतरास लवकर मंजुरी द्यावी, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांकडे केली. पंतप्रधानांनी त्यावर विचार करू,असे आश्वासन दिल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. याखेरीज कोणतीही माहिती ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांना दिली नाही

    Only Kovid and Bengal renaming discussed during PM Modi’s visit: Mamata Banerjee

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Modi Putin : मोदींची पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा; म्हणाले- भारतात तुमचे स्वागत करण्यास उत्सुक

    Indian Army : भारतीय लष्कर आणि हवाई दलाला 200 नवीन हलके हेलिकॉप्टर मिळणार; जुने चेतक-चित्ता हेलिकॉप्टर निवृत्त केले जातील

    Government : सरकार तेल कंपन्यांना ₹30 हजार कोटी देणार; यामुळे उज्ज्वला सिलेंडरवर ₹300ची सबसिडी मिळत राहणार