• Download App
    प्रचारबंदीच्या काळात ममतांनी जपला पेंटिंगचा छंद|On dharna against EC's campaign ban, Mamata Banerjee takes to painting

    प्रचारबंदीच्या काळात ममतांनी जपला पेंटिंगचा छंद

    वृत्तसंस्था

    कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज प्रचारबंदीच्या काळात आपला पेंटिंगचा छंद जोपासला. आज त्यांनी ना कोणत्या प्रचारसभेत भाग घेतला, ना कोठे रोड शो केला.On dharna against EC’s campaign ban, Mamata Banerjee takes to painting

    ममता आज सकाळी त्यांनीच जाहीर केलेल्या कार्यक्रमाप्रमाणे कोलकात्यातील गांधीमूर्तीपाशी आल्या आणि त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. त्यावेळी त्या तिथे एकट्या होत्या. तृणमूळचे नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या आसपास दिसले नाहीत.



    थोडा वेळाने ममतांनी आपल्या जवळचा कॅनव्हास काढला आणि पेंटिंग करायला सुरूवात केली. त्या पेंटिंग करू लागताच काही उत्सुकतेने ते पाहण्यासाठी त्यांच्याजवळ आले. कोणी व्हिडिओ काढला. फोटो काढला पण त्यांच्या पेंटिंगच्य कामात कोणी व्यत्यय आणला नाही. ममतांनी थोड्या वेळात दोन पेंटिंग पूर्ण केली.

    ममता बॅनर्जींना काव्य आणि पेटिंगचा छंद आहे. त्यांनी केलेली पेंटिंग आतापर्यंत लाखो रूपयांना विकली गेली आहेत. ममतांनी भले आज प्रचार केला नसेल. पण निवडणूकीच्या प्रचाराच्या धबडग्यात बंदीच्या निमित्ताने का होईना आपला पेंटिंगचा छंद मात्र पुरवून घेतला.

    On dharna against EC’s campaign ban, Mamata Banerjee takes to painting

     

     

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट