राहुल गांधी यांनी आज एक ग्राफिक छायाचित्र ट्विट केले, ज्यामध्ये त्यांनी अदानीसह काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसद सदस्यत्व गेल्यानंतर राहुल गांधींच्या निशाण्यावर केंद्र सरकार आणि भाजपा आहे. अदानी प्रकरणावरून राहुल गांधी सातत्याने मोदी सरकारवर टीका करत आहेत. ताजे प्रकरण राहुल गांधी यांच्या आज केलेल्या ट्विटचे आहे. राहुल गांधींनी ट्विट करून अदानींच्या कंपन्यांमध्ये २० हजार कोटींचा बेनामी पैसा कुणाचा आहे? हा प्रश्न विचारला आहे. तर राहुल यांच्या या ट्विटवर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. Now we will meet directly in the court Himanta Sarmas counterattack after Rahul Gandhi’s that tweet
‘राहुल गांधी राष्ट्रीय नेत्यासारखे नाही तर…’, अनिल अँटनी यांनी काँग्रेस नेत्यांवर सोडले टीकास्त्र!
वास्तविक, राहुल गांधी यांनी आज एक ग्राफिक छायाचित्र ट्विट केले, ज्यामध्ये त्यांनी अदानीसह काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. त्यात गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य सिंधिया, हिमंता बिस्वा सरमा आणि अनिल अँटनी यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून लिहिले की, , “सत्य लपवतात, म्हणूनच दररोज भटकवतात, प्रश्न तोच आहे – अदानींच्या कंपन्यांमध्ये 20,000 कोटी बेनामी रक्कम कुणाची आहे?”
आता आपण कोर्टातच भेटू- सरमा
राहुल गांधींच्या या ट्विटवर हिमंता बिस्वा सरमा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधींच्या ट्विटला रिट्विट करत सरमा यांनी लिहिले की,’’ ही आमची शालीनता आहे की तुम्ही बोफोर्स आणि नॅशनल हेराल्ड घोटाळ्यांचे पैसे कुठे लपवले हे आम्ही तुम्हाला कधीच विचारले नाही आणि तुम्ही ओटावियो क्वात्रोचीला अनेकदा भारतीय कायद्याच्या कचाट्यातून पळून जाण्याची परवानगी दिली, आता आपण कोर्टातच भेटू.”
जयराम रमेश यांचा आरोप –
अदानीच्या शेल कंपन्यांमध्ये २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचा काँग्रेसचा दावा आहे. अलीकडेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी गौतम अदानी यांचे चिनी नागरिकांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. ते चिनी व्यावसायिकांशी व्यापार करतात, जे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहे, असं ते म्हणाले आहेत.
Now we will meet directly in the court Himanta Sarmas counterattack after Rahul Gandhi’s that tweet
महत्वाच्या बातम्या
- आज PM मोदी एकाच वेळी करणार दोन वंदे भारताचे लोकार्पण, या राज्यांतील प्रवाशांना मिळणार लाभ
- अदानींच्या समर्थनाचे पवारांचे वक्तव्य, काँग्रेस हायकमांडला टोचून महाराष्ट्रातल्याच महाविकास आघाडीला सुरुंग!!
- सावरकर मुद्द्यावर बॅकफूटवर ढकलेले काँग्रेस नेतृत्व अदानी मुद्द्यावर पवारांच्या मुलाखतीच्या डावपेची राजकारणापुढे झुकेल??
- नऊ वर्षांत तब्बल २३ दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी; प्रत्येकाचं कारण मात्र एकच ते म्हणजे…