• Download App
    आता फ्रान्सयमधील शास्त्रज्ञांना आढळला ओमिक्रॉनपेक्षा नवाच प्रकार । Now scientists in France have discovered a new type of omicron

    आता फ्रान्सयमधील शास्त्रज्ञांना आढळला ओमिक्रॉनपेक्षा नवाच प्रकार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : ओमिक्रॉनची दहशत सर्व जगाला वाटत असताना फ्रान्सकमधील शास्त्रज्ञांना ओमिक्रॉनपेक्षा नवा प्रकार आढळला आहे. त्यांनी या विषाणूला ‘आयएचयू’ (बी.१.६४०.२) असे नाव दिले आहे. Now scientists in France have discovered a new type of omicron

    सध्या जगातील अनेक भागात ओमिक्रॉनचा प्रसार होत झालेला आहे तर ‘आयएचयू’च्या धोकाही वाढण्याची शक्यता आहे. मात्र सध्या तरी हा प्रकार अन्य देशांत आढळलेला नाही किंवा जागतिक आरोग्यय संघटनेच्या तपासणीत त्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.



    ‘आयएचयू’मध्ये ४७ उत्परिवर्तने आढळली आहेत. ओमिक्रॉनपेक्षाही तो जास्त परिवर्तनीय आहे. म्हणूनच त्याच्यात लस प्रतिरोधकाची क्षमता मोठ्या प्रमाणावर असून तो जास्त संसर्गजन्य आहे. मार्सेलिसमध्ये या प्रकाराची लागण झालेले १२ रुग्ण सापडले आहेत. त्यातील बहुतेकजण कॅमेरून या आफ्रिकी देशात जाऊन आलेले आहेत, अशी माहिती संशोधकांनी दिली.

    ऑक्सफर्ड नॅनोपोर टेक्नॉलॉजीच्या ग्रीडऑन या उपकरणावरील आधुनिक जनुकीय आराखड्यातून मिळविलेल्या जनुकांमध्ये १४ अमिनो आम्लाचे पर्याय स्पाईक प्रोटिनमध्येत आढळले. यात ‘एन५०१वाय’ आणि ‘ई४८४के’सह नऊ जनुकीय बदलांचा समावेश आहे. जनुकांच्या या रचनेचा समावेश ‘बी.१.६४०.२’ या नव्या गटात केला आहे. ‘बी.१.६४०’ या या उत्क्रांत गटातील तो आहे, असे या संशोधनपर माहितीत नमूद केले आहे.

    Now scientists in France have discovered a new type of omicron

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Voter Registration : नवीन मतदाराला द्यावा लागेल पालकांच्या SIR चा तपशील; आतापर्यंत फक्त जुन्या मतदारांना लागू होते; EC ने म्हटले- यामुळे ओळख-नोंद जुळवणे सोपे होईल

    Tvisha Sharma : ट्विशा शर्माचे त्वचेचे नमुने जिम बेल्टवर सापडले; दिल्ली एम्सने 11 पानांचा फॉरेन्सिक अहवाल सीलबंद लिफाफ्यात सीबीआयला सोपवला

    Dr. Manmohan Singh : माजी CEC चा दावा, मनमोहन म्हणाले होते- मी आत्महत्या करेन; कुरेशी म्हणाले– माजी पीएमचे बोलणे ऐकून मी आश्चर्यचकित झालो होतो