Tuesday, 13 May 2025
  • Download App
    आता पाकिस्तानकडून इराणवर हवाई हल्ला, अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्याचा दावा!|Now air attack on Iran by Pakistan claiming to have destroyed many terrorist bases

    आता पाकिस्तानकडून इराणवर हवाई हल्ला, अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्याचा दावा!

    यापूर्वी इराणने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला होता. तेव्हापासून पाकिस्तान चिडला आहे


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : चवताळलेल्या पाकिस्तानने इराणवर हवाई हल्ला केला आहे. पाकिस्तानने हवाई मार्गाने इराणमध्ये घुसून बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) आणि बलुचिस्तान लिबरेशन फोर्स (बीएलएफ) च्या अनेक स्थानांवर हल्ला केल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला आहे.Now air attack on Iran by Pakistan claiming to have destroyed many terrorist bases

    या हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांची अनेक ठिकाणे उद्ध्वस्त झाल्याची पुष्टी पाकिस्तानच्या माध्यमांनी दिली आहे. मात्र, हा हल्ला कुठे, किती आणि कोणाच्या ठिकाणांर करण्यात आला हे पाकिस्तानकडून अद्याप सांगण्यात आलेले नाही.



    यापूर्वी इराणने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला होता. तेव्हापासून पाकिस्तान चिडला आहे. पाकिस्तानातील राजकीय लोक आणि सर्वसामान्य जनता याविरोधात सोशल मीडियावर सातत्याने निषेध करत आहे. आता पाकिस्तानातून इराणमध्ये हवाई हल्ल्याची बातमी आली आहे.

    पाकिस्तानी मीडिया सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी चालवत आहे ज्यात असे म्हटले जात आहे की इराणमध्ये बीएलए दहशतवाद्यांच्या अनेक ठिकाणांना लक्ष्य केले जात आहे. पाकिस्तानी मीडियाचा दावा आहे की इराणमध्ये घुसल्यानंतर पाकिस्तानी हवाई दलाने बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि बलुचिस्तान लिबरेशन फोर्स आणि इतर दहशतवादी संघटनांचे अनेक तळ उडवून दिले आहेत. या हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

    Now air attack on Iran by Pakistan claiming to have destroyed many terrorist bases

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांची मुलगी अदितीच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरून वादग्रस्त पोस्ट

    Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?

    Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!