विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभेची 2024 ची निवडणूक अद्याप तीन वर्षे लांब आहे. तरीदेखील पंतप्रधानपदाच्या स्पर्धकांच्या संख्येत वाढ झालेली बघायला मिळते आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सध्या 303 खासदारांचे भाजपचे स्वबळ आहे. शिवाय एनडीए घटक पक्षांचे देखील बळ आहे. त्यांना भाजपमधून सध्या पंतप्रधान पदासाठी स्पर्धा नाही. पण विरोधी पक्षांकडून मात्र बडी – बडी नावे पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत उतरु लागली आहेत.Nitish Kumar is now in PM post race after Mamata banerjee and sharad pawar
त्यातले “लेटेस्ट” नाव नितीशकुमारांचे आहे. नितीश कुमार हे पंतप्रधानपदाचे मटेरियल आहेत. त्यांच्याकडे ती क्षमता आहे, असे राजकीय वक्तव्य संयुक्त जनता दलाच्या पार्लमेंटरी बोर्डाचे प्रमुख उपेंद्र कुशवाहा यांनी करून नितीश कुमार यांची “रिंग” पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत टाकून दिली आहे.
वास्तविक संयुक्त जनता दल आणि भाजप यांची युती बिहारमध्ये सत्तेवर आहे. भाजपकडे आमदारांची संख्या जास्त असताना देखील दिलेला शब्द पाळण्यासाठी कमी आमदारांच्या संयुक्त जनता दलाच्या नितीश कुमार यांना भाजपने पाठिंबा दिला आहे. त्यांच्या पाठिंब्याच्या बळावर नितीशकुमार बिहारचे मुख्यमंत्रीपद भूषवत आहेत.
मात्र त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते उपेंद्र कुशवाह यांनी नितीश कुमार यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे केले आहे. त्याच वेळी नरेंद्र मोदी यांच्याशी ही स्पर्धा नाही, अशी मखलाशी करण्यास ते विसरलेले नाहीत.
अर्थात नितीश कुमार यांचे नाव पंतप्रधानपदासाठी 2021 मध्येच घेतले गेलेले आहे असे मानण्याचे कारण नाही. 2014 च्या निवडणुकीत भाजपला संपूर्ण बहुमत मिळाले नसते तर एनडीए चे तडजोडीचे उमेदवार म्हणून नितीशकुमारांचे घोडे पंतप्रधानपदासाठी पुढे दामटण्यात आले असते. पण घडू शकले नाही कारण भाजपला पूर्ण बहुमत मिळाले.
आता 2024 च्या निवडणुकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव विरोधी पक्षांकडून पंतप्रधानपदासाठी पुढे केले जाऊ शकते. त्या स्वतः सर्व विरोधी पक्षांची मोदी विरोधात मोट बांधण्यासाठी पुढे आल्या आहेत. त्यांनी काँग्रेसशीही सूत जुळविले आहे. त्यामुळे त्यांचे नावही पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत घेतले जात आहे.
शरद पवार हे तर गेल्या तीस वर्षांपासून पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत आहेतच. प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीत मराठी माध्यमे त्यांच्या पंतप्रधानपदाची चर्चा आवर्जून घडवून आणतात. पण त्यांना अजून पंतप्रधानपद मिळू शकलेले नाही.आता उपेंद्र कुशवाह यांनी नितीश कुमार यांच्या रूपाने पंतप्रधानपदासाठी आणखी एक नाव स्पर्धेत उतरविले आहे एवढेच…!!
Nitish Kumar is now in PM post race after Mamata banerjee and sharad pawar
महत्त्वाच्या बातम्या
- जबरदस्त : जम्मू -काश्मिरात देशद्रोह आणि दगडफेक करणाऱ्यांना ना पासपोर्ट मिळणार, ना सरकारी नोकरी; आदेश जारी
- Inspiring : शेतमजुराची मुलगी बनली सीबीएसई 12 वीची टॉपर, अडचणींवर मात करत मिळवले 100 % गुण
- चर्चेची 12वी फेरी सकारात्मक : लडाखमधील 2 वादग्रस्त स्थळांवरून माघार घेण्यास चीन तयार, पीएलए हॉट स्प्रिंग आणि गोगरा पॉइंटमधून माघार घेणार
- आता तुम्ही तुमचे वय फेसबुकपासून लपवू शकणार नाही, १३ वर्षांपेक्षा कमी वयाचे युजर्स ओळखसाठी हे खास तंत्रज्ञान वापरणार