वृत्तसंस्था
बांदीपूरा – काश्मीर आणि पश्चिम बंगालमधील लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचे कनेक्शन राष्ट्रीय तपास संस्था एनआयएने उघडकीस आणले आहे. काश्मीरमध्ये बांदीपूरामधून अल्ताफ अहमद या शाळेतल्या शिक्षकाला एनआयएने अटक केली आहे. NIA arrests a recruiter of Lashkar-e-Taiba in LeT Recruitment Module Case.
अल्ताफला अटक पश्चिम बंगालच्या टीना परवीन हिने दिलेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली आहे. ही टिना परवीन बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्याची रहिवासी आहे. ती आयटी प्रोफेशनल आहे. तिच्या काही ऍक्टिव्हीटीज संशयास्पद वाटल्या म्हणून तिला यापूर्वी एनआयएने अटक केली होती. तिच्या तपासा आणि चौकशी दरम्यान काही धक्कादायक गोष्टी बाहेर आल्या. यामध्ये लष्कर ए तैयबासाठी तरूणांची भरतीची बाब उघडकीस आली.
बंगाल आणि काश्मीरमधून हे तरूण भरती करण्यात येत होते. यामध्ये काश्मीरमधील भरती ऑपरेशनमध्ये अल्ताफ अहमद हा एका शाळेतला शिक्षक मध्यस्थाची भूमिका बजावत होता. अल्ताफचे लष्कर ए तैयबाशी संबंध होते. टीना परवीन आणि अल्ताफ यांचे सोशल मीडिया साइटवरून संबंध आले. त्यानंतर बंगालमधून भरती प्रक्रिया कशी करता येईल, याची दोघांमध्ये चर्चा सुरू झाली. अल्ताफने परवीनची ओळख त्याच्या पाकिस्तानी ऑपरेटर्सशी करून दिली.
भारतात विविध प्रकारचे जिहाद फैलावण्यासाठी तरूणांची भरती करण्याची मॉडस ऑपरेंडी तयार करण्याचे काम टिनाला देण्यात आले. पण ती पकडली गेली. तिच्या चौकशीतून अल्ताफचे नाव पुढे आले. आता एनआयएने त्यालाही अटक केली आहे. टिनावर आधीच आरोपपत्र दाखल झाले आहे. अल्ताफचा तपास आणि चौकशी चालू आहे, असे एनआयएच्या सूत्रांनी सांगितले.
NIA arrests a recruiter of Lashkar-e-Taiba in LeT Recruitment Module Case.
इतर बातम्या
- पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या उर्वरित ४ टप्प्यांमध्ये बदल नाही; निवडणूक आयोगाचा खुलासा; कोविड प्रोटोकॉल पाळून प्रचारावर चर्चा
- पुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा कायम, बॅकलॉग 45 हजारांवर ; 20 एप्रिलनंतर बाजारात ?
- पश्चिम बंगालमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक; कोविड प्रोटोकॉल पाळून प्रचारावर चर्चा
- वैद्यकीय प्रवेश परीक्षा पुढे ढकलली ; कोरोना संक्रमण, रुग्णवाढीमुळे निर्णय