• Download App
    द फोकस एक्सप्लेनर : नॅशनल हेराल्ड प्रकरणात एकटे पडले काँग्रेसचे युवराज, राहुल गांधींना विरोधकांची मिळाली नाही साथ| National Herald case: What came out of Rahul Gandhi's 10 hour ED interrogation ??; Inquiry again today !!; But what about the show of strength ?

    नॅशनल हेराल्ड केस : राहुल गांधींच्या 10 तास ईडी चौकशीत काय बाहेर आले??; आज पुन्हा चौकशी!!; पण शक्तीप्रदर्शनाचे काय??

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड मनी लॉड्रिंग प्रकरणी खासदार राहुल गांधी यांची सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी तब्बल 10 तास चौकशी केली. या चौकशीत असे काही तपशील मिळाले आहेत की ईडीने त्यांना आज पुन्हा चौकशीसाठी बोलवले आहे.National Herald case: What came out of Rahul Gandhi’s 10 hour ED interrogation ??; Inquiry again today !!; But what about the show of strength ?

    राहुल गांधी यांच्या चौकशीच्या निमित्ताने काँग्रेसने काल देशभर आंदोलनातून शक्तीप्रदर्शन केले. पण आज पक्षाचे नेते पुन्हा असे शक्तीप्रदर्शन करणार आहेत की नाही, याची काल रात्री उशिरापर्यंत कोणी माहिती दिली नव्हती. छत्तीसगड आणि राजस्थानचे मुख्यमंत्री रात्री उशिरापर्यंत दिल्लीत थांबले होते. पण आजही ते दिल्लीत थांबणार आहेत की नाही?, याची कोणाला माहिती नाही.



    राहुल गांधी यांची सोमवारी सकाळी त्यांची सलग 3 तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर दुपारी 3 च्या सुमारास जेवणाची सुटी झाली आणि राहुल थेट सर गंगाराम रुग्णालयात दाखल असलेल्या सोनिया गांधींना भेटायला गेले. त्यांच्यासोबत प्रियांका गांधीही होत्या. सुमारे 40 मिनिटांनंतर राहुल गांधी ईडीच्या कार्यालयात परतले. त्यानंतर त्यांची जवळपास साडेपाच तास पुन्हा चौकशी करण्यात आली. या मॅरेथॉन चौकशीनंतर राहुल रात्री 10.00 च्या सुमारास ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले.

    दुसरीकडे, काँग्रेस प्रवक्ते व खासदार रणदीप सुरजेवाला यांनी पोलिसांवर माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्याशी धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, की पोलिसांनी चिदंबरम यांच्याशी झटापट केली. त्यांचा चष्मा जमिनीवर फेकला. यामुळे त्यांच्या डाव्या बरगडीला हेअरलाइन फ्रॅक्चर झाले. खासदार प्रमोद तिवारी यांनाही रस्त्यावर फेकण्यात आले. त्यांचेही डोके व बरगडीत फ्रॅक्चर झाले आहे. हीच लोकशाही आहे काय?’

    याआधी सकाळी राहुल गांधी पूर्ण जोशात ईडीच्या कार्यालयात आले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना 50 हून अधिक प्रश्न विचारले. यापूर्वी काँग्रेसने या कारवाईला कडाडून विरोध केला होता.

    राहुल गांधींसोबत ईडी कार्यालयात जाणाऱ्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत आणि काँग्रेस खासदार रणदीप सिंह सुरजेवाला यांचा समावेश आहे. प्रियांका गांधी यांनी तुघलक रोड पोलीस ठाणे गाठून या नेत्यांची भेट घेतली.

    राहुल गांधींना घरातून ईडी कार्यालयात पोहोचण्यासाठी लागली 45 मिनिटे

    10.42 AM: प्रियांका गांधी यांच्यासह राहुल वाहनातून काँग्रेस मुख्यालयासाठी घरातून निघाले. तत्पूर्वी पक्षाचे अनेक मोठे कार्यकर्ते त्यांच्या घरी पोहोचले होते.

    10:49 AM: राहुल ऑफिसच्या मुख्यालयात पोहोचले. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथे राहुल-प्रियांका यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

    10:58 AM: ED कार्यालयासाठी रवाना. काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी पक्ष मुख्यालयापासून ईडी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. राहुल यांच्यासोबत आलेल्या नेत्यांना पोलिसांनी ईडी कार्यालयापासून एक किलोमीटर अंतरावर रोखले. यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. यावेळी बराच गदारोळ झाला, काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली. अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

    11:27 AM : राहुल ईडी कार्यालयात पोहोचले. तेव्हापासून त्यांची चौकशी सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश, मुकुल वासनिक, दिग्विजय सिंग, दीपेंद्र हुडा, पवन खेरा, पीएल पुनिया, गौरव गोगोई, मीनाक्षी नटराजन यांच्यासह काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतले. मध्य दिल्लीतून बसमध्ये बसवून या नेत्यांना घेऊन गेले. येथे काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी तुघलक रोड पोलिस स्टेशनच्या एसएचओला पत्र देऊन पोलिस कर्मचाऱ्यांवर मारहाणीचा आरोप केला.

    राहुल – प्रियांका एकत्र निघाले होते

    राहुल गांधींच्या हजेरीपूर्वी प्रियांका गांधी वाड्रा त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचल्या होत्या. येथून राहुल-प्रियांका काँग्रेस मुख्यालयात पोहोचल्या आणि पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह पक्षाचे खासदार आणि इतर नेते पायी चालत ईडी कार्यालयाकडे रवाना झाले. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून काँग्रेसचा मोर्चा थांबवला आणि नेत्यांना पुढे जाऊ दिले नाही. राहुल गांधी प्रियांकांसोबत कारने ईडीच्या मुख्यालयात पोहोचले होते.

    National Herald case: What came out of Rahul Gandhi’s 10 hour ED interrogation ??; Inquiry again today !!; But what about the show of strength ?

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य