वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सिनेमाचा फीवर राजकीय नेत्यांवर चढण्यात काही विशेष नाही. असाच मध्यंतरी सगळ्यांवर पुष्पाचा फिवर चढला होता. पण नॅशनल हेराल्ड केसमध्ये “झुकेगा नही साला” असे म्हणणाऱ्या काँग्रेसचा “पुष्पा” मात्र पोलिसांच्या हाताखालून झुकांडी देऊन पोलिसांच्या दंडुक्याच्या भीतीने पळून गेला आहे… काँग्रेसच्या या पुष्पाचे नाव आहे, बी. व्ही. श्रीनिवास आणि तो आहे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष!! National Herald case Congress Pushpa fleeing in fear of police
सध्या नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्याचा निषेध करत दिल्लीत काँग्रेस कार्यकर्ते जोरदार निदर्शने करत होते. त्यावेळी काँग्रेसचा युवक काँग्रेसचा अध्यक्षही निदर्शने करत होता, त्यावेळी सुरुवातीला ‘आम्ही पोलिसांना घाबरत नाही’, असे छातीठोकपणे सांगणारा हा नेता प्रत्यक्षात जेव्हा पोलिसांनी कारवाई सुरु केली तेव्हा धूम ठोकून पळाला, तसा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
ईडीच्या कार्यालयासमोर निदर्शने!
नॅशनल हेराल्डप्रकरणी 2000 कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप सध्या गांधी घराण्यावर होत आहे. याप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात ईडीने समन्स बजावले आहे. सोमवारी, १३ जून रोजी राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. यावेळी राहुल गांधींच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी मुख्य कार्यालयापासून ईडी ऑफिसपर्यंत प्रदर्शन केले. त्यात काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेतेही सहभागी झाले होते. यावेळी घडलेल्या एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
काय आहे तो व्हिडीओ?
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. भारतीय जनता युवा मोर्चाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेला युवक काँग्रेसचा अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास निषेध आंदोलन करताना एका माध्यमांशी बोलताना म्हणालि की, आम्ही राहुल गांधींचे कार्यकर्ते आहोत. अटक अथवा पोलिसांच्या लाठीला घाबरणारे नाही. त्यानंतर काही वेळात सोशल मीडियात श्रीनिवास यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात ते पोलिसांच्या हातातून निसटून पोबारा करताना दिसून आले. भारतीय जनता युवा मोर्चाने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
National Herald case Congress Pushpa fleeing in fear of police
महत्वाच्या बातम्या
- विधान परिषद (ना)उमेदवारी : पंकजा मुंडेंचे समर्थक भाजप नेत्यांच्या विरोधात रस्त्यावर!!
- राज्यसभा निवडणूक : राऊतांचे आरोप 6 आमदारांवर; पण खुलासा द्यायला पवारांकडे गेले एकटे देवेंद्र भुयार!!; रहस्य काय??
- नुपुर शर्मा : प्रयागराज मध्ये रस्त्यावर दगड फेकले; मास्टर माईंड जावेद पंपच्या घरावर बुलडोजर चालला!!
- विधान परिषद : शिवसेनेच्या जखमेवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची मलमपट्टी; तरीही महाविकास आघाडीच्या एकीत बेकी!!; ही बेकी नेमकी हवीये कोणाला??