• Download App
    माझे पणजोबा देशसेवक, कोणाच्या सर्टिफिकेटची त्यांना जरूरत नाही; राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोलMy grandfather countryservaent they don't need anyone's certificate;

    माझे पणजोबा देशसेवक, कोणाच्या सर्टिफिकेटची त्यांना जरूरत नाही; राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेचे उत्तर देताना भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. पंडित नेहरू यांच्या बोटचेप्या धोरणामुळे गोव्यासारख्या प्रदेश भारताच्या स्वातंत्र्यानंतरही 15 वर्षे पोर्तुगीजांच्या गुलामगिरीत राहिला, असा आरोप मोदींनी नेहरूंचे नाव घेऊन केला. नेहरूंवर त्यांनी प्रखर टीकास्त्र सोडले होते.My grandfather countryservaent they don’t need anyone’s certificate;

    या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी मोदींवर प्रतिहल्ला चढवला आहे. राहुल गांधी म्हणाले, की माझे पणजोबा पंडित जवाहरलाल नेहरू हे देशसेवक होते. आयुष्यभर त्यांनी देशाची सेवा केली. माझ्या पणजोबांना कोणत्याही व्यक्तीच्या सर्टिफिकेटची गरज नाही. ते (मोदी) कॉंग्रेसला घाबरतात. कारण काँग्रेस नेहमी सत्य बोलत आली आहे आणि सत्याचा त्यांच्याशी (मोदींशी) काहीही संबंध नाही, असा टोला राहुल गांधी यांनी मोदींचे नाव न घेता लगावला.

    पंतप्रधान मोदींचे सर्व भाषण आहे काँग्रेस भोवतीच केंद्रित होते. परंतु मी कोरोना संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली नाहीत. कोरोनाचा प्रभाव देशाला आर्थिक खाईत घेऊन जाईल असा इशाराही मी दिला होता. त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. आजही मी चीन आणि पाकिस्तानचा धोका याविषयी वारंवार बोलत आहे त्याकडे त्यांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे. अन्यथा देशाला त्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे.

    My grandfather countryservaent they don’t need anyone’s certificate;

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    CJI Ramana : माजी CJI रमणा म्हणाले- माझ्या कुटुंबावर बनावट खटले दाखल केले; हा सर्व माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होता

    Army Chief : लष्करप्रमुख म्हणाले- ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला धडा शिकवला, आता अवकाश-सायबर युद्ध हे नवे आव्हान

    Omar Abdullah : जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसच्या नाराजीने ओमर यांच्या अडचणी वाढल्या:11 रोजी 2 जागी पोटनिवडणूक