• Download App
    मुंबईत "इंडिया" आघाडीचा "मास्टर स्ट्रोक"; तर दिल्लीत मोदींचा "ग्रँडमास्टर स्ट्रोक"!! Mumbai india master stroke in delhi modi grandmaster stroke

    मुंबईत “इंडिया” आघाडीचा “मास्टर स्ट्रोक”; तर दिल्लीत मोदींचा “ग्रँडमास्टर स्ट्रोक”!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मुंबईमध्ये “इंडिया” आघाडीची बैठक भरून विरोधकांनी एकजुटीचा “मास्टर स्ट्रोक” मारला आहे, तर त्या पुढे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “ग्रँडमास्टर स्ट्रोक” मारला आहे. Mumbai india master stroke in delhi modi grandmaster stroke

    “इंडिया” आघाडीची मुंबईत बैठक सुरू असतानाच पंतप्रधान मोदींनी भारताचा सर्वांत तरुण ग्रँडमास्टर प्रज्ञानानंद याला आपले अधिकृत निवासस्थान 7 लोक कल्याण मार्ग येथे निमंत्रित करून त्याचा सत्कार केला आहे. पण त्या पलीकडे जाऊन संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याचा खरा “ग्रँडमास्टर स्ट्रोक” आहे!!

    आजच्या दिवसापुरते टाइमिंग एवढेच पाहिले तर ज्यावेळी “इंडिया” आघाडीची मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये बैठक सुरू झाली, त्याचवेळी भारताचा बुद्धिबळातला सर्वात तरुण ग्रँडमास्टर प्रज्ञानानंद हा 7, लोक कल्याण मार्ग या पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी होता. तेथे मोदींनी त्याच्याकडून बुद्धिबळाचे नेमके डावपेच समजून घेतले. त्याच्याशी गप्पा मारल्या. त्याच्या प्रशिक्षकांचा आणि आईचाही सत्कार केला. त्यामुळे माध्यमांचे लक्ष मुंबई बरोबर दिल्लीतही गेले.

    या भेटीपूर्वी काही वेळच आधी मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन 18 ते 22 सप्टेंबर या 5 दिवसांत घेण्याचे जाहीर केले, मात्र त्याचा कोणताही अजेंडा जाहीर केला नाही. त्यामुळे राजकीय तर्क वितर्कांना उधाण आले. त्यातून अनेकांनी सूत्रांच्या हवाल्याने “एक देश, एक निवडणूक” विधेयक या अधिवेशनात मांडले जाण्याचे तर्क काढले. आता हा तर्क बरोबर येतो की नाही हे सरकारचा खुलासा झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. पण इंडिया आघाडीच्या “मास्टर स्ट्रोक” वर मोदींनी मारलेला हा “ग्रँडमास्टर स्ट्रोक” आहे हे मात्र निश्चित!!.

    मूळात “इंडिया” आघाडीने एकजूट टिकवून सलग तिसऱ्यांदा बैठक बोलावली आहे. ती बैठक ग्रँड हयात हॉटेलमध्ये आज आणि उद्या होत आहे. विरोधकांची एकजूट न तुटता ती तीन बैठकांपर्यंत टिकणे हाच “इंडिया” आघाडीचा मास्टर स्ट्रोक आहे आणि हा “मास्टर स्ट्रोक” गृहीत धरला, तर मोदींनी मारलेला “ग्रँडमास्टर स्ट्रोक”च म्हणावा लागेल. कारण त्यांनी विरोधकांना त्यातून तर्कवितर्क लढविणे भाग पाडले आहे.

    Mumbai india master stroke in delhi modi grandmaster stroke

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    NIA Finds : दिल्लीतील बॉम्बस्फोटापूर्वी काश्मिरी जंगलात चाचणी; ‘एनआयए’कडे पुरावे, कटाच्या मुळापर्यंत पोहोचणार

    Lok Sabha : लोकसभेत निवडणूक सुधारणांवर चर्चा, मतचोरीवर वादंग; राहुल गांधींना दुबेंचे उत्तर- पदांचे बक्षीस तर काँग्रेस देत होती

    गुजरातेत 6 वर्षांच्या चिमुरडीवर निर्भयासारखे क्रौर्य; बलात्कारात अपयशी ठरल्याने गुप्तांगात रॉड घातला, आरोपीला अटक