नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आज रात्री ८.३० वाजता भाषण; कोणत्या दिशेने राजकीय लढाई नेऊन देणार महिला आरक्षण??, असा सवाल आज समोर आला.
मोदी सरकारने लोकसभेत आणलेल्या महिला आरक्षण आणि परिसीमन विधेयकांचा दोन तृतीयांश बहुमता अभावी पराभव झाल्यानंतर मोदी स्वतः प्रथमच देशाला संबोधित करणार आहेत. त्यापूर्वी लोकसभेत केलेल्या भाषणात त्यांनी महिला आरक्षणाला विरोध कराल तर तुम्हाला दीर्घकाळ त्याची राजकीय किंमत चुकवावी लागेल असा इशारा विरोधकांना दिलाच होता. पण त्यानंतर सुद्धा विरोधकांनी दोन्ही विधेयकांच्या विरोधात 230 मते दिली त्यामुळे दोन्ही विधेयके पराभूत झाली. मोदी सरकारच्या कारकीर्दीत लोकसभेत प्रथमच दोन विधेयकांचा मतदानाच्या आधारे पराभव झाला.
त्यामुळेच मोदी आज नेमकी कोणती भूमिका जाहीर करणार??, याविषयी देशभरात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. मोदी 2023 मध्ये संसदेने मंजूर केलेले महिला आरक्षण जसेच्या तसे लागू करणार??, त्यानुसार २०२९ लोकसभा निवडणुका घेणार की अन्य कुठली क्रांतीकारक घोषणा करणार?? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
.भाजपमध्ये महिलांना 33 % आरक्षण??
संपूर्ण देशात महिला आरक्षण लागू होवो किंवा न होवो मोदी भाजप आणि मित्र पक्षांसाठी वेगळीच राजकीय उपाययोजना म्हणून आपल्या पक्षाला आणि मित्र पक्षांना 33 % महिला आरक्षण लागू करायला सांगतील का??, असाही सवाल या निमित्ताने समोर आला आहे.
महिला आरक्षणावर लोकसभेच्या निवडणुका??
त्याचबरोबर मोदी कुठले प्रचंड मोठे धक्का तंत्र वापरून विद्यमान लोकसभाच बरखास्तीची शिफारस राष्ट्रपतींना करतील की काय आणि त्यानंतर महिला आरक्षण आणि लोकसभा परिसीमन या मुद्द्यांवर थेट लोकसभेच्या निवडणुका घेतील की काय याविषयी सुद्धा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात कुजबूज ऐकू येत आहे.
कारण नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना आत्तापर्यंत असे अनेक धक्के दिलेत की जे विरोधी पक्षांनी किंवा अगदी सर्वसामान्य जनतेने सुद्धा अपेक्षिले नव्हते. त्यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी असेच देशाला संबोधित करून नोटबंदी केली होती. त्यानंतर २०२१ मध्ये कोविडच्या काळात देशभर लॉकडाऊन लावले होते. नरेंद्र मोदींनी आपल्या कारकिर्दीत असे अनेक धक्कादायक निर्णय घेतले.
लोकसभेची मध्यावधी निवडणूक??
त्यामुळे आज देशाला संबोधित करताना नरेंद्र मोदी विरोधकांना आणि नागरिकांना कुठला राजकीय धक्का देणार??, ते महिला आरक्षणाची लढाई कोणत्या दिशेला नेणार??, थेट जनमताच्या कौल घेण्यापर्यंत ते जाऊन पोहोचणार की अन्य कुठल्या विषयावर मोदी बोलणार, याविषयी देशात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. कारण विरोधकांनी काल महिला आरक्षण विधेयक पाडले असले तरी त्याच मुद्द्यावर थेट सार्वत्रिक निवडणुकीला किंवा लोकसभेच्या मध्यवधी निवडणुकीला सामोरे जाण्याची काँग्रेस किंवा बाकीच्या विरोधी पक्षांची तयारी नाही. त्यामुळे त्यांना सापळ्यात अडकवून बाजी मारायचा डाव मोदी खेळू शकतात, याविषयी सुद्धा राजकीय वर्तुळात कुजबूज आहे.
Modi’s speech tonight at 8:30 PM.
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींनी लिहिले, भारत ने देख लिया, INDIA ने रोक दिया!!; पण लाडक्या बहिणींचा कसा आणि कुठे बसेल फटका??
- राहुल गांधींचे ब्रिटिश आणि भारतीय दुहेरी नागरिकत्व; अलाहाबाद उच्च न्यायालयाचे FIR दाखल करण्याचे आदेश, CBI चौकशी करा!!
- YouTube : यूट्यूब ॲपमधून असे पूर्णपणे हटवा ‘शॉर्ट्स’; रीलचे व्यसन सोडवण्यात होईल मदत
- Anil Ambani : बँक फसवणूक प्रकरणात अनिल अंबानींना दिलासा नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कायम
Kangana Ranaut : कंगना यांचा काँग्रेसवर निशाणा; म्हटले- मला तिकीट मिळालं, तेव्हा यांच्या प्रवक्त्याने माझ्यासाठी लिहिलं, मंडीत काय भाव चालू आहे