विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी संसदेत दिलेल्या भाषणाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. आज ते संसदेत आक्रमक दिसले, ज्यात त्यांनी काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. पीएम मोदींनी अनुराग ठाकूर (Anurag Thakur ) यांच्या भाषणाची यूट्यूब लिंक शेअर केली आणि ते ऐकलेच पाहिजे असे म्हटले.
व्हिडिओ लिंक शेअर करताना, पंतप्रधानांनी एका एक्स-पोस्टमध्ये म्हटले आहे की, “माझे तरुण आणि उत्साही सहकारी अनुराग ठाकूर यांचे हे भाषण ऐकलेच पाहिजे. हे सत्य आणि विनोद यांचे अद्भुत मिश्रण आहे, जे INDI आघाडीच्या गलिच्छ राजकारणाचा पर्दाफाश करते.”
लोकसभेत राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
वास्तविक, अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्या लोकसभेतील भाषणाचा प्रतिवाद केला, तेव्हा त्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या. आपल्या भाषणात भाजप नेत्याने राहुल गांधींच्या जात जनगणनेवर जोरदार प्रहार केला आणि म्हटले की ज्यांना त्यांची जात माहिती नाही ते मोजणीबद्दल बोलतात. आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेसच्या कथित घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आणि राहुल गांधींवर निशाणा साधताना त्यांनी मागील काँग्रेस सरकारच्या अनेक उणिवा सांगितल्या.”
LoPला केला ‘लीडर ऑफ प्रपोगंडा!’
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर त्यांच्या “चक्रव्यूह” उपहासासाठी जोरदार हल्ला चढवत अनुराग ठाकूर यांनी काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी 1947 पासून लागोपाठ काँग्रेस सरकारांवर लिहिलेल्या पुस्तकातील उतारे उद्धृत केले आणि आरोप केला की, राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेतेपदाला बदलून- LoP ते ‘लीडर ऑफ प्रपोगंडा’ केले आहे.
राहुल गांधी आपल्या भाषणात काय म्हणाले?
सोमवारी राहुल गांधी यांनी ‘चक्रव्यूह’ हा शब्द वापरत असा दावा केला होता की, सगळीकडे भीतीचे वातावरण आहे आणि सहा जणांचा एक गट संपूर्ण देशाला ‘चक्रव्यूह’मध्ये अडकवत आहे. ते म्हणाले होते की, ‘चक्रव्यूह’ला कमळाच्या आकारामुळे (भाजपचे निवडणूक चिन्ह) ‘पद्मव्यूह’ असेही म्हणतात.
राहुल गांधींच्या या वक्तव्याचा निशाणा साधत भाजप नेते अनुराग ठाकूर म्हणाले की, राजीव हासुद्धा कमळाचा समानार्थी शब्द आहे. ते म्हणाले की, तुम्ही कमळाला हिंसेशी जोडले, म्हणजे तुम्ही राजीव यांनाही हिंसाचाराशी जोडता का?”
अनुराग ठाकूर यांचे भाषण
modi share anurag thakur speech
महत्वाच्या बातम्या
- यूपी सरकारने लव्ह जिहादवर जन्मठेपेचे विधेयक आणले; धर्मांतर रोखण्यासाठी घेतला निर्णय, तुरुंगवास आणि दंडात वाढ
- राज्यसभेत ‘जया अमिताभ बच्चन’ म्हटल्यावर जया बच्चन संतापल्या!
- भारतात व्हॉट्सॲप बंद होणार का? आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले ‘हे’ उत्तर
- आज पुन्हा राहुल गांधी आणि काँग्रेसची अपरिपक्वता जनतेसमोर उघड झाली ‘