• Download App
    Modi is not immature to make Sharad Pawar president of India पवारांना आपल्या "डोक्यावरच्या" पदावर बसवून

    पवारांना आपल्या “डोक्यावरच्या” पदावर बसवून घ्यायला मोदी एवढे “राजकीय मूढ” आहेत का??

    Sharad Pawar

    केंद्रामध्ये मोदी सरकारच्या राजकारणाच्या ॲडजस्टमेंट मध्ये राज्यमंत्रीपद टिकवलेल्या रामदास आठवले यांनी शरद पवारांना थेट राष्ट्रपतीपदावर बसवून टाकले. यातून त्यांनी शरद पवारांना टोला हाणला, टोमणा मारला की त्यांच्या जखमेवर मीठ चोळले??, हा सवाल तर तयार झालाच, पण त्या पलीकडे जाऊन शरद पवार यांच्यासारख्या अतिउपद्रवी आणि अतिउपद्व्यापी राजकारण्याला आपल्या डोक्यावरच्या पदावर बसवून घ्यायला पंतप्रधान नरेंद्र मोदी एवढे “राजकीय मूढ” आहेत का??, हा खरं म्हणजे आठवले यांच्यासारख्या अनेक वर्षे मंत्रिपदे राहिलेल्या नेत्याला पडायला हवा होता. पण राजकारणात “पवार बुद्धीने” एन्ट्री केलेल्या आठवलेंना अजूनही आपल्यावरचे पवारांचे गारुड उतरवता येत नसल्याने त्यांनी पवारांना राष्ट्रपतीपदाच्या खुर्चीवर परस्पर “बसवून” टाकले.Modi is not immature to make Sharad Pawar president of India



    पण ज्यांना नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तीचे, मुख्यमंत्र्याचे आणि पंतप्रधानांचे राजकारण थोडेफार तरी माहिती आहे, त्या व्यक्तींनी, कार्यकर्त्यांनी अथवा नेत्यांनी असली मोदींच्या नावाने “परस्पर चूक” केली नसती. कारण मोदींचे राजकारण हे संघ आणि भाजपच्या मुशीतून घडले असले, तरी ते नंतर टप्प्याटप्प्याने मोदींच्या वैयक्तिक प्रतिमावर्धनात आणि करिष्म्यात परिवर्तित झाले. सुरुवातीला संघ आणि भाजपच्या संघटनेच्या बळावर आणि त्यानंतर मोदींच्या कर्तृत्वाच्या बळावर हे राजकारण बळकट होत गेले. या दरम्यानच्या कालावधीत मोदी स्वकर्तृत्वाने एवढे मोठे झाले, की त्यांच्यापुढे भले भले कर्तृत्ववान नेते फिके पडले आणि टप्प्याटप्प्याने अस्तंगत होत गेले. या सर्व कालावधीत मोदी यांच्यासमोर टिकणारा आणि त्यांना गंभीर आव्हान देणारा नेताच उभा राहू शकला नाही. यामधून मोदींचे राजकीय कर्तृत्व जसे सिद्ध होते, तसेच मोदी राजकीय कौशल्याच्या सर्व निकषांवर यशस्वी ठरले, हे देखील सिद्ध होते. आणि मोदींचे हे राजकीय कौशल्य असे की, मोदींनी कधी कुठल्या नेत्याला अथवा कार्यकर्त्याला आपल्या स्वतःच्या प्रतिमेपेक्षा मोठा होऊ दिलेले नाही. आपल्या प्रतिमेला धक्का बसेल किंवा कुठल्या पदावर बसून आपल्याला आव्हान देऊ शकेल, असा कुठलाही नेता मोदींनी कुठल्याही आव्हानात्मक पदावर नेऊन बसवलेला नाही. त्या उलट साधारणपणे जनतेत फारसा माहिती नसलेल्या, पण कर्तृत्ववान असलेल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मोदींनी वरिष्ठ पदांवर बसविण्याचे कौशल्य दाखविले. रामनाथ कोविंद, द्रौपदी मुर्मू, निर्मला सीतारामन, एस. जयशंकर ही त्याची उदाहरणे ठरली. यापैकी एकही नेता “लोकनेता” या कॅटेगरीत बसणारा नाही. कुणीही जनतेमध्ये फारसा माहिती देखील नव्हता, पण म्हणून हे नेते कर्तृत्वात कुठे कमी होते असे नव्हे, म्हणूनच मोदींनी त्यांना त्यांच्या कपॅसिटीनुसार वेगवेगळ्या पदांवर काम करण्याची संधी दिली.

    पवारांचे उपद्रवमूल्य मोदींना माहिती

    मोदींच्या या निकषात शरद पवार बसतच नाहीत. कारण शरद पवार हे महाराष्ट्रात का होईना पण “लोकनेते” आहेत. पण त्याही पलीकडे जाऊन शरद पवारांचे जे राजकीय मूल्य, राजकीय उपद्रवमूल्य आणि राजकीय अतिमहत्त्वाकांक्षा हे जे गुण आणि अवगुण आहेत, त्यामुळे मोदींनी शरद पवारांना राष्ट्रपतीपदासारख्या आपल्या डोक्यावरच्या पदावर बसवून घेणे शक्य नव्हते. कारण पवारांनी मोदींच्या डोक्यावरच्या पदावर बसून ज्या काही राजकीय काड्या केल्या असत्या किंवा जे उपद्रव दिले असते, ते स्वतः मोदींनाच निस्तरावे लागले असते, त्यामुळे मोदी पवारांना राजकीय गुरु मानत असले आणि त्यांना वैयक्तिक पातळीवर कितीही मान देत असले, तरी पवारांसारखा “अविश्वासार्ह” नेता आपल्या डोक्यावरच्या पदावर बसवून घेणे म्हणजे नेमकी कोणती पीडा स्वतःला करून घेणे किंवा स्वतःमागे शुक्लकाष्ठ लावून घेणे??, हे मोदींना निश्चित समजते म्हणूनच मोदींनी पवारांना राष्ट्रपती करणे शक्य नव्हते आणि तसे त्यांनी केलेही नाही!!

    मोदींनी पवारांना वैयक्तिक सन्मान देत राजकीय दृष्ट्या हाताच्या अंतरावरच ठेवले. त्यांना त्यापुढे अजून तरी येऊ दिलेले नाही, याचा अर्थ खरं म्हणजे आठवले यांच्यासारख्या अनेक वर्षे मंत्रीपदी राहिलेल्या नेत्याला समजायला हवा होता. पण तो समजला नाही कारण “पवार बुद्धीने” त्यांच्या बुद्धीवर चढवलेले कुंठण आठवले अद्याप उतरवू शकलेले नाहीत.

    Modi is not immature to make Sharad Pawar president of India

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पाकिस्तानला भारताशी करायचाय composite dialogue, पण त्यामध्ये 370 आणि सिंधू जल करार घुसवायचा विषारी डाव!!

    Murmu : राज्यपाल-राष्ट्रपतींसाठी डेडलाइन निश्चित करण्यावर मुर्मू यांचे सुप्रीम कोर्टाला 14 प्रश्न

    Jaishankar : जयशंकर म्हणाले- पाकिस्तानकडे दहशतवाद्यांची यादी; ती द्यावी लागेल, काश्मीरवर चर्चेआधी PoK रिकामा करा