• Download App
    रशियाच्या २ तेलसाठ्यांवर युक्रेनकडून क्षेपणास्त्र हल्ला, पुरवठा विस्कळीत करण्याचे धोरण । Missiles fired from Ukraine at two Russian oil reserves Strike, supply disruption strategy

    रशियाच्या २ तेलसाठ्यांवर युक्रेनकडून क्षेपणास्त्र हल्ला, पुरवठा विस्कळीत करण्याचे धोरण

    वृत्तसंस्था

    मॉस्को : रशियाच्या २ तेलसाठ्यांवर युक्रेनचा क्षेपणास्त्र हल्ला करून पुरवठा विस्कळीत करण्याचे धोरण राबविले आहे. युद्धाच्या तिसऱ्या महिन्यात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री व संरक्षण सचिवांच्या दौऱ्याने युक्रेनचे मनोबल वाढवले आहे. युक्रेनच्या डोनबासवर हल्ला करण्यासाठी रशिया ज्या ब्रान्स्क शहरातून रसद मिळवत होता, त्या शहरावर रविवारी रात्री युक्रेनने क्षेपणास्त्र हल्ले केले. यात २ तेलसाठ्यांना भीषण आग लागली. रशियाचे आकाश आगीच्या प्रकाशाने व नंतर धुराने काळवंडले. Missiles fired from Ukraine at two Russian oil reserves Strike, supply disruption strategy



    ब्रिटिश गुप्तचर विभागाने म्हटले आहे, रशिया युक्रेनची संरक्षण यंत्रणा तोडण्यात अपयशी ठरली आहे. रशियाच्या अनेक लष्करी तुकड्या थकल्या आहेत. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने हेही म्हटले आहे की, कीव्हवरील हल्ल्यावेळी ज्याप्रकारे रशियाने कमकुवत लष्करी सामग्री आणि ताकदीचा वापर केला होता, तसाच वापर डोनबासवरील हल्ल्यांसाठीही केला.

    Missiles fired from Ukraine at two Russian oil reserves Strike, supply disruption strategy

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    गुजरात-राजस्थानमध्ये सुरू होते ड्रग्जचे रॅकेट ATS-NCBने केला पर्दाफाश!

    महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खानला अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

    Vande Metro Train: वंदे मेट्रो ट्रेन लवकरच सुरू होणार, प्रवाशांना मिळणार इंटरसिटीसारख्या सुविधा!