• Download App
    Meet The Champion : पंतप्रधान मोदींची सरप्राईज योजना ! अहमदाबादेत योजनेची सुरूवात करणार गोल्ड मेडलीस्ट नीरज चोप्रा ... । Meet The Champion: PM Modi's surprise plan! Gold medalist Neeraj Chopra to launch scheme in Ahmedabad ...

    Meet The Champion : पंतप्रधान मोदींची सरप्राईज योजना ! अहमदाबादेत योजनेची सुरूवात करणार गोल्ड मेडलीस्ट नीरज चोप्रा …

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : ऑलंम्पिकला गेलेल्या खेळाडुंची पंतप्रधान मोदी यांनी 16 ऑगस्टला भेट घेतली होती. त्यामुळे या खेळाडुंना शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांसी संवाद साधण्यास मोदींनी सांगितलं होतं. आता पंतप्रधान मोदींच्या एका महत्वाच्या योजनची सुरूवात गोल्ड मेडलीस्ट नीरज चोप्राच्या हस्ते होणार आहे. या आठवड्यात नीरज चोप्रा अहमदाबादला जाणार आहे. ही योजना नक्की काय असेल याकडे युवावर्ग लक्ष ठेवून आहे.लवकरच हे मोदींचे सरप्राईज आपल्या समोर येईल. Meet The Champion: PM Modi’s surprise plan! Gold medalist Neeraj Chopra to launch scheme in Ahmedabad …



    गोल्ड मेडल मिळाल्यानंतर देशातले अनेक तरुण नीरज चोप्राला आपला आयडॉल मानत आहेत. तरुणाईवरचा निरजचा प्रभाव वाढला आहे. त्याच्या मार्गदर्शनाच मोठा फायदा देशातील युवा पिढीला नक्कीच होईल. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करत माहिती दिली आहे की, नीरज चोप्रा 4 डिसेंबरला अहमदाबादला जाणार आहे. अहमदाबादमध्ये जाऊन नीरज चोप्रा संस्कारधाम स्कूलमध्ये योजनेचा प्ररंभ करणार आहे.

    मीट द चॅम्पियन कॅम्पेन लॉन्च

    केंद्रीय क्रिडा मंत्रालयाने मीट द चॅम्पियन कॅम्पेन लॉन्च केले आहे. त्यात विद्यार्थ्यांना अनेक दिग्गज खेळाडूंकडून मार्गदर्शन मिळणार आहे आणि त्यातून देशात आणखी दिग्गज खेळाडू तयार करण्यास मदत होणार आहे.  ऑलंम्पिक खेळलेले खेळाडू या योजनेनुसार जानेवारीपासून शाळांमध्ये जाणार आहेत आणि विद्यार्थ्यांना आणि खेळाडुंना मार्गदर्शन करणार आहेत. नीरज चोप्राने यंदाच्या ऑलंम्पिकमध्ये सर्वात लांब भाला फेकत देशाला गोल्ड मेडल मिळवून दिलं होतं. त्यामुळे देशाची मान आणखी उंचावली आहे.

    Meet The Champion : PM Modi’s surprise plan! Gold medalist Neeraj Chopra to launch scheme in Ahmedabad …

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य