विशेष प्रतिनिधी
अमृतसर : ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंना पायघड्या घातल्या जात असताना देश-विदेशातील स्पर्धांत पदके जिंकणाऱ्या दिव्यांग खेळाडूंना शासकीय नोकरीसाठीही झगडावे लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या खेळाडूंनी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करत पदके फेकून दिली.Medal-winning Divyanga players throw medals on the streets, protest in front of Punjab CM’s residence
या खेळाडूंनी आत्मदहन करण्याचाही इशारा दिला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतासाठी पदके जिंकून देणारे बॅडमिंटन खेळाडू संजीव कुमार, कराटे खेळाडू तरुण शर्मा यांच्यासह विविध खेळाडूंचा समावेश होता. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला विविध पदके मिळवून देणारे खेळाडू शासकीय नोकरीपासून वंचित आहेत.
पंजाबमधील अमरिंदरसिंग यांच्या सरकारने त्यांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे हे खेळाडू संतप्त झाले आहेत. नोकरीसाठी चकरा मारून आम्ही कंटाळलो आहोत. आमच्या पैशाने प्रशिक्षण घेतो, देश-विदेशातील स्पर्धांमध्ये खेळतो. मात्र, पंजाब सरकारकडून आम्हाला कोणतीही मदत मिळत नाही अशी खंत या खेळाडूंनी व्यक्त केली.
व्हिलचेअर बॅडमिंटन खेळाडू संजीवकुमार हे पंजाबमधील एकमेव पॅरा बॅडमिंटन खेळाडू आहेत. त्यांनी आत्तापर्यंत देशासाठी १३ पदके जिंकली आहेत. यामध्ये पाच सुवर्णपदके आहेत. मात्र, गेल्या तेरा वर्षांपासून नोकरीसाठी वणवण फिरत आहे. याची दखल सरकारकडून घेतली जात नाही.
पॅरा कराटे खेळाडू तरुण शर्मा भावूक होऊन म्हणाले, आत्तापर्यंत सात देशांतील स्पर्धांमध्ये पदरमोड करून भारताचे प्रतिनिधीत्व केले. त्यासाठी बारा लाख रुपयांवर कर्ज झाले. देशासाठी नऊ पदके मिळाली. मात्र, राज्य सरकारने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे लुधियानातील भाजी बाजारात भाजी विकून गुजराण करावी लागत आहे.
Medal-winning Divyanga players throw medals on the streets, protest in front of Punjab CM’s residence
महत्त्वाच्या बातम्या
- इन्फोसिसचे शेअर्स उच्चांकी पातळीवर, १०० बिलीयन डॉलर्सची कंपनी, बाजारमूल्य ७.४५ कोटी रुपये
- युवराजांच्या बालहट्टाची किंमत १६८ कोटी रुपये, सायकल ट्रॅकला महामार्गापेक्षा ५०० पट अधिक खर्च
- ‘योगी नाही हा तर भोगी… असं वाटलं त्याच चपलेनं थोबाड फोडावं’ : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, अटकेची मागणी
- राणे यांच्यावर आकसाने कारवाई, प्रथमच केंद्रीय मंत्र्याला अटक ; राणेंच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया