• Download App
    शिवसेनेच्या जळगावच्या महापौर, उपमहापौरासह २५ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा, भाजप कार्यालयात धक्काबुक्की करत सोडली डुकरे Shiv Sena's Jalgaon mayor, deputy mayor and 25 others have been charged with rioting.

    शिवसेनेच्या जळगावच्या महापौर, उपमहापौरासह २५ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा, भाजप कार्यालयात धक्काबुक्की करत सोडली डुकरे

    विशेष प्रतिनिधी

    जळगाव : शिवसेनेच्या जळगावच्या महापौर आणि उपमहापौरांसह २५ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप कार्यालयात अनधिकृतपणे प्रवेश करून पक्ष कार्यकर्त्यांना धक्का बुक्की केली होती. महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभुषण पाटील यांचा यामध्ये समावेश आहे. Shiv Sena’s Jalgaon mayor, deputy mayor and 25 others have been charged with rioting.

    केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध अपशब्द वापरल्याने शिवसेनेच्या वतीने महापौर जयश्री महाजन उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे प्रीतम शिंदे शोभा चौधरी सरिता कोल्हे आदींनी राणे यांचा निषेध म्हणून शहरात आंदोलन केले.



    टॉवर चौकात डुकरे सोडून राणे यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. त्यानंतर महापालिकेच्या कार्यालयाच्या बाहेर घोषणाबाजी केली. तेथून भाजपच्या वसंत स्मृती या कार्यालयास अनधिकृतपणे प्रवेश करून पक्ष कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली.

    या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी मुंबई पोलीस अधिनियम सदतीस तीनशे उल्लंघन देखील केलेले आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी कमलेश भगवान पाटील यांच्या फियार्दीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

    Shiv Sena’s Jalgaon mayor, deputy mayor and 25 others have been charged with rioting.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sangli temple : सांगलीच्या जतमध्ये मंदिराची भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू; मरगुबाई देवीच्या यात्रेत भीषण दुर्घटना, वादळी वारा आणि पावसामुळे पडली भिंत

    Maharashtra Heatwave Alert : महाराष्ट्रात उष्णतेची लाट: राज्यात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट; पारा 46 अंशांच्या पार जाण्याचा अंदाज

    Sharad Pawar : शरद पवारांची सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी; मोदींना म्हणाले- राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय – प्रक्रिया राबवा