• Download App
    पंतप्रधानांना बळजबरीने मिठी मारणारा बहुजन समाज पक्ष नव्हे; मायावतींचा राहुल गांधींना जोरदार टोला!! Mayawati slammed Rahul Gandhi

    Rahul – Mayawati : पंतप्रधानांना बळजबरीने मिठी मारणारा बहुजन समाज पक्ष नव्हे; मायावतींचा राहुल गांधींना जोरदार टोला!!

    वृत्तसंस्था

    लखनौ : उत्तर प्रदेशात भाजपचा अभूतपूर्व विजय झाल्यानंतर त्याचे खापर बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावतींवर फोडणाऱ्या राहुल गांधींना खुद्द मायावती यांनी जोरदार टोला हाणला आहे. काँग्रेसने स्वतःची काळजी करावी. इतर पक्षांची काळजी करत बसू नये. बहुजन समाज पक्ष म्हणजे पंतप्रधानांना बळजबरीने मिठी मारणारा पक्ष नव्हे, अशा खोचक शब्दात मायावती यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले आहे. Mayawati slammed Rahul Gandhi

    उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि बहुजन समाज पक्ष या दोघांचाही दारुण पराभव झाला. त्याविषयी तब्बल दोन महिन्यांनंतर भाष्य करताना राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या पराभवाचे खापर मायावतींवर फोडले. काँग्रेसची बहुजन समाज पक्षाशी युती करण्याची इच्छा होती. मायावती मुख्यमंत्री झाल्या असत्या तरी मला चालले असते. परंतु मायावतींनी आमची ऑफर धुडकावली आणि भाजपला मोकळे रान करून दिले, असा आरोप राहुल गांधी यांनी कालच केला होता.

    राहुल गांधी यांच्या आरोपाला मायावती यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपला संपूर्ण देश काँग्रेसमुक्तच नव्हे तर विरोधीपक्ष मुक्त करायचा आहे. ग्रामपंचायतीपासून देशपातळीपर्यंत यांना एकाच पक्षाची सत्ता आणायची आहे. त्या भाजपच्या विरोधात आम्ही प्रामाणिकपणे लढतो आहोत. आम्ही म्हणजे पंतप्रधानांना बळजबरीने मिठी मारणारा पक्ष नव्हे, असा टोला मायावतींनी राहुल गांधी यांना लगावला.

    राहुल गांधी यांनी माझ्या मनात द्वेष नाही, असे म्हणत लोकसभेत कामकाज सुरू असताना मधेच आपल्या आसनावरून उठून पंतप्रधान मोदींच्या आसनाजवळ जात त्यांना बळजबरीने मिठी मारली होती. त्यावेळी लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी तीव्र नाराजी देखील व्यक्त केली होती. हाच संदर्भ घेऊन मायावती यांनी राहुल गांधींना तडाखा हाणला आहे.

    Mayawati slammed Rahul Gandhi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट