• Download App
    म्हणे, राणेंच्या टिपण्णीने लोकसभेचा स्तर "घसरला"; पण राहुलच्या भाषणाने मात्र तो "उंचावला"; मराठी माध्यमांचे अजब तर्कट!! Marathi media double standards, targets narayan rane, but praise rahul gandhi for loksabha speeches

    म्हणे, राणेंच्या टिपण्णीने लोकसभेचा स्तर “घसरला”; पण राहुलच्या भाषणाने मात्र तो “उंचावला”; मराठी माध्यमांचे अजब तर्कट!!

    मोदी सरकार वरील अविश्वास ठरावावर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भाषणांमधून विशिष्ट अर्थ काढून मराठी माध्यमांनी अजब तर्कट लढविले आहे. नारायण राणेंच्या भाषणाने लोकसभेत महाराष्ट्राची लाज निघाली, तर राहुल गांधींचे भाषण मात्र वैचारिक पातळी “उंचावणारे” ठरले असे अजब तर्कट मराठी माध्यमांनी लढविले. Marathi media double standards, targets narayan rane, but praise rahul gandhi for loksabha speeches

    अविश्वास ठरावाच्या चर्चेच्या पहिल्या दिवशी आजी-माजी शिवसैनिकांमध्ये जी जुंपली होती, त्यामध्ये ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचा समाचार घेताना नारायण राणे यांनी ठाकरे गटाची औकात काढली. वास्तविक राणेंचे ते पूर्ण लांबीचे ते भाषण नव्हते, तर दोन-तीन मिनिटांची टिपण्णी होती. राणे नेहमीच्या आक्रमक शैलीत ठाकरे गटावर घसरले. एखाद्या जाहीर सभेत करावे असे भाषण त्यांनी लोकसभेत केले. पण त्यामुळे देशाला अव्वल संसदपटू देणाऱ्या महाराष्ट्राने आता नारायण राणेंसारखे नेते देशाला दिलेत का??, हाच तो महाराष्ट्र आहे का?? असा मानभावी सवाल अनेक मराठी माध्यमांनी केला.


    Rahul Gandhi : लोकसभेत राहुल गांधींचा फ्लाईंग किस; अभद्र वर्तनाबद्दल महिला खासदारांची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार


    वास्तविक नारायण राणेंच्या भाषणात कोणता असंसदीय शब्द होता??, याचा खुलासा मात्र माध्यमांनी केला नाही. राणेंच्या दोन-तीन मिनिटांच्या टिपण्णी मध्ये सभापतींच्या चेअरवर बसलेल्या खासदार राजेंद्र अग्रवाल यांनी, मंत्रीजी व्यक्तिगत टिपण्णी से बचिए, असे म्हणून त्यांना आवरही घातला. पण राणेंचे भाषण संसदेतले वाटण्यापेक्षा जाहीर सभेतले वाटले ही वस्तुस्थिती आहे. पण म्हणून ते भाषण म्हणजे, “कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा”, या धर्तीवरचा गळा काढण्यासारखे निश्चितच नव्हते. किंवा महाराष्ट्राने आतापर्यंत अव्वल दर्जाचे संसदपटू दिले आणि आता नारायण राणेंसारखे खालच्या दर्जाचे संसदपटू महाराष्ट्राने दिल्लीत पाठविले आहेत, असे म्हणण्यासारखी ही परिस्थिती नव्हती. पण मराठी माध्यमांनी राणेंना ठोकून काढण्यासाठी त्यांच्या दोन-तीन मिनिटांच्या टिपण्णीचे निमित्त वापरले.

    पण मराठी माध्यमांनी एकीकडे राणेंना असे ठोकून काढले, तर याच माध्यमांनी दुसरीकडे राहुल गांधींच्या असंसदीय भाषणाची जोरदार स्तुती केली. निखिल वागळे, अशोक वानखेडेंसारख्या पत्रकारांनी तर राहुल गांधींनी म्हणे मोदी सरकारचे वाभाडे काढून सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली, असे सांगितले. बाकीच्या मराठी माध्यमांनी राहुल गांधींच्या भाषणाची अशीच अफाट स्तुती केली.

    पण याच राहुल गांधींचे भाषण बारकाईने ऐकल्यावर त्यांनी किती असंसदीय शब्द वापरले, कसा औचित्यभंग केला, हे सर्वसामान्य माणसालाही कळून येते आणि त्याचेच प्रतिबिंब लोकसभा सभापतींच्या निर्णयात देखील पडले. राहुल गांधींच्या भाषणातील भारतमातेची “हत्या”, “देशद्रोही”, “गद्दार”, “मारा गया” हे शब्द लोकसभा सभापतींना लोकसभेच्या रेकॉर्ड मधून काढावे लागले. यातच राहुल गांधींच्या बौद्धिक पातळीची कल्पना आली!!

    विसंगती उघडी पडलीच

    राहुल गांधींनी कोणताही मुलाहिजा न ठेवता लोकसभेत आक्षेपार्ह भाषा वापरली. संसदीय भाषेचे संकेत, परंपरा पायदळी तुडवून टाकली. लोकसभेत फ्लाईंग किस देऊन ते निघून गेले. त्यावर मानभावी माध्यमांनी “निवडकपणे” कोणती टिपण्णी केली नाही. पण राणेंचे दोन-तीन मिनिटांचे भाषण मात्र या माध्यमांना महाराष्ट्राचा स्तर घसरविणारे वाटले. यातून मराठी माध्यमांचा दुटप्पीपणा बाहेर दिसलाच पण राणे आणि राहुल गांधी यांच्या भाषणांमधली संसदीय आणि असंसदीय अशी मूळ विसंगती लपून राहिली नाही… ती पडायची ती उघडी पडलीच!!

    Marathi media double standards, targets narayan rane, but praise rahul gandhi for loksabha speeches

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक