वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी काँग्रेस हायकमांडवर आणि काँग्रेस नेत्यांवर तोफा डागण्याची तीव्रता वाढल्यानंतर काँग्रेस हायकमांडने देखील त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे पंजाब प्रभारी हरीश रावत यांना मैदानात उतरवले आहे. Many prominent ministers came to Delhi with complaint that with Captain at the helm of affairs
हरीश रावत यांनी कॅप्टन अमरिंदरसिंग यांना धारेवर धरले आहे. कॅप्टन अमरिंदरसिंग हे आदरणीय नेते असले तरी त्यांनी अनेकदा सांगूनही पंजाबला दिलेली आश्वासने पाळली नाहीत. इतकेच नाही तर कॅप्टन आणि अकाली दलाचा बादल परिवार यांच्यात गुप्त समझोता झाल्याची बाब संपूर्ण पंजाबमध्ये पसरली आहे. त्याचा कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी कधीही इन्कार केला नाही. यातून काँग्रेसच्या नेतृत्वाचा भ्रमनिरास झाला, असे हरीश रावत यांनी पत्रकारांना सांगितले.
कॅप्टन साहेबांनी पंजाबला दिलेली आश्वासने पाळली नाहीत. मोफत वीज, शेतकऱ्यांची धान्य खरेदी या सगळ्या बाबी काँग्रेसने जाहीरनाम्यात लिहिल्या होत्या. त्यांच्या अनेक सहकारी मंत्र्यांनी अनेकदा त्यांना या आश्वासनांची आठवण करून दिली. मी किमान पाच वेळा कॅप्टन साहेबांशी या विषयावर चर्चा केली. परंतु त्यामध्ये कोणतीही प्रगती झाली नाही. अखेरीस काँग्रेस नेतृत्वाला हायकमांडला पंजाब मध्ये नेतृत्व बदलाचा विचार करावा लागला, असा दावा हरीश रावत यांनी केला.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या ते भेटीगाठी घेत आहेत. या पार्श्वभूमीवर हरीश रावत यांनी अमरिंदर सिंग यांच्यावर पलटवार करून घेतले आहेत.
अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री पदावर कायम ठेवले तर काँग्रेस पंजाब मध्ये पुन्हा जिंकू शकणार नाही, असे अनेक वरिष्ठ मंत्र्यांनी अनेकदा काँग्रेस हायकमांडला प्रत्यक्ष भेटून सांगितले होते. त्याची खातरजमा केल्यानंतरच पंजाबने नेतृत्व बदल करण्यात आला, असा दावा हरीश रावत यांनी केला.
Many prominent ministers came to Delhi with complaint that with Captain at the helm of affairs
महत्त्वाच्या बातम्या
- आजपासून गॅस सिलिंडरचे दरामध्ये वाढ, नवीन ऑटो डेबिट पेमेंट सिस्टिम; १ ऑक्टोबरपासून लागू झाले हे ६ मोठे बदल
- अफझलखान वधाच्या पोस्टरवरून झालेल्या मिरज दंगलीचा खटला ठाकरे- पवार सरकारकडून मागे; १०६ जणांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- Letter to PM CM : पत्रास कारण की, आमचे दात येत नाहीयेत; चिमुकल्यांना मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांच भन्नाट उत्तर ; म्हणाले..
- शाळा सुरू करण्यापूर्वी लोकल प्रवासाचा प्रश्न सोडवा , शिक्षक परिषदेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी