• Download App
    ममता बॅनर्जी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार, त्रिपुरातील हिंसाचार आणि बीएसएफच्या अधिकारक्षेत्राचा मुद्दा उपस्थित करणार । Mamta Banerjee will meet Prime Minister Narendra Modi today, will raise the issue of Tripura violence and the jurisdiction of BSF

    ममता बॅनर्जी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार, त्रिपुरातील हिंसाचार आणि बीएसएफच्या अधिकारक्षेत्राचा मुद्दा उपस्थित करणार

    तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ममता पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर सीमा सुरक्षा दलाच्या अधिकारक्षेत्रात वाढ करण्याबरोबरच त्रिपुरातील व्यापक हिंसाचाराचे मुद्दे मांडणार आहेत. ममता बॅनर्जी संध्याकाळी ५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. Mamta Banerjee will meet Prime Minister Narendra Modi today, will raise the issue of Tripura violence and the jurisdiction of BSF


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ममता पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर सीमा सुरक्षा दलाच्या अधिकारक्षेत्रात वाढ करण्याबरोबरच त्रिपुरातील व्यापक हिंसाचाराचे मुद्दे मांडणार आहेत. ममता बॅनर्जी संध्याकाळी ५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

    त्रिपुरामध्ये मागच्या काळात मोठ्या प्रमाणावर झालेल्या हिंसाचाराबद्दल ममता बॅनर्जी म्हणाल्या की, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग किंवा कलम ३५५ आता कुठे आहे? भारत सरकारने त्रिपुराला किती नोटिसा पाठवल्या आहेत? त्यांना संविधानाची पर्वा नाही. जनतेची फसवणूक करणे एवढेच त्यांचे काम आहे.

    विरोधकांची मोट बांधण्याचा ममतांचा प्रयत्न

    संसदेच्या अधिवेशनापूर्वी ममता बॅनर्जी यांचा तीन दिवसांचा दिल्ली दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात असल्याची माहिती आहे. तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर त्या बीएसएफच्या अधिकारांसह इतर अनेक मुद्द्यांवर सरकारला घेराव घालण्यासाठी विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतील, असे मानले जात आहे.



    त्याचबरोबर कृषीविषयक कायदे मागे घेण्याच्या घोषणेनंतर विरोधकांनी पुन्हा एकदा संसदेत सरकारला घेराव घालण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशिवाय विरोधी पक्षांच्या इतर नेत्यांना भेटू शकतात.

    Mamta Banerjee will meet Prime Minister Narendra Modi today, will raise the issue of Tripura violence and the jurisdiction of BSF

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही

    Cotton : कापड व्यापारी 31 डिसेंबरपर्यंत टॅरिफमुक्त कापूस आयात करू शकतील; वस्त्रोद्योग क्षेत्राला 50% अमेरिकन टॅरिफपासून वाचवण्याचा निर्णय