वृत्तसंस्था
कोलकता : ममता बॅनर्जींचे हे नेहमीचे झाले आहे. मोदी सरकार पुढे आत मध्ये सरेंडर आणि बाहेर हल्लाबोल. ममता बॅनर्जी जेव्हा अडचणीत सापडतात तेव्हा त्या केंद्र सरकार पुढे शरणागती पत्करतात आणि बाहेर येऊन हल्लाबोल करतात, असे शरसंधान विरोधी पक्ष नेते सुरेंद्र अधिकारी यांनी पुन्हा एकदा साधले आहे. Mamata Banerjee’s Modi government always surrenders internally
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा गेल्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला होता. पण त्याचा काही उपयोग झाला नाही, असे वक्तव्य सुवेंदू अधिकारी यांनी केले होते. अधिकारी यांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त करताना ममता बॅनर्जी यांनी त्यांना आव्हान दिले होते. त्या म्हणाल्या होत्या, की मी कधीच अमित शाह यांना फोन केला नाही. मी फोन केल्याचे सिद्ध केले तर मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईन, असे आव्हान ममता बॅनर्जी यांनी अधिकारी यांना दिले होते.
या आव्हानासंदर्भात सुवेंदू अधिकारी यांना प्रश्न विचारल्यानंतर अधिकारी यांनी त्यावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. ममता बॅनर्जींचे आव्हान मी स्वीकारतो. त्यांनी हवे तर कोर्टात जाऊन माझ्याविरुद्ध बदनामीचा खटला भरावा. पण ममता बॅनर्जी यांचे हे नेहमीचच आहे. त्या अडचणीत सापडल्या की केंद्र सरकार पुढे छुप्या पद्धतीने शरणागती पत्करतात आणि बाहेर येऊन हल्लाबोल करतात. त्यांच्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेला आहे. तो परत मिळणार नाही. त्यांनी कितीही प्रयत्न केले, स्वतःच्या पक्षाला आंतरराष्ट्रीय तरुणांमुळे काँग्रेस असे नाव ठेवले तरी देखील त्यांचा प्रादेशिक दर्जा वाढणार नाही. इथून पुढे ईव्हीएम मध्ये वरती राष्ट्रीय पक्षाची चिन्हे येतील आणि खाली प्रादेशिक पक्षाची चिन्हे येतील. तसेच प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रांवर राष्ट्रीय पक्षांच्या प्रतिनिधींना पुढे जागा मिळेल आणि प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना मागे जागा मिळेल,असा टोलाही सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना लगावला आहे.
सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींचे आव्हान स्वीकारल्यानंतर आता तृणामूळ काँग्रेस मधून कोणती प्रतिक्रिया व्यक्त होते?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Mamata Banerjee’s Modi government always surrenders internally
महत्वाच्या बातम्या
- अजितदादांच्या कथित बंडाने काय साधले??; राष्ट्रीय विरोधी ऐक्याचे भीष्मपितामह संशयाच्या जाळ्यात अडकले!!..
- विदेशी निधी प्रकरणी ऑक्सफॅम इंडियाविरुद्ध CBIने दाखल केला गुन्हा!
- ‘डझनभर मुलांना जन्म देणाऱ्यांची ही लोकसंख्या आहे’, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची टिप्पणी!
- सचिन पायलट यांची जालंधर पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करत काँग्रेसकडून बोळवण