Mamata Banerjee : पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ममता म्हणाल्या की, बंगालच्या जनतेने पैशाची शक्ती नाकारली आहे आणि त्यांनी मां-माटी-मानुषची निवड केली आहे. तृणमूल कॉंग्रेसने 21 जुलै रोजी शहीद दिन साजरा केला. यावेळी टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी कार्यक्रमास व्हर्च्युअल रूपाने भाषण केले. आपल्या भाषणात ममता म्हणाल्या की, भाजपने देशाला अंधकारात ढकलले आहे, केंद्रातील सत्तेतून त्यांना बेदखल करेपर्यंत आता खेला होबे. mamata Banerjee Takes A Dig At Modi Govt Says Khela Hobe Till BJP Removed from Power
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ममता म्हणाल्या की, बंगालच्या जनतेने पैशाची शक्ती नाकारली आहे आणि त्यांनी मां-माटी-मानुषची निवड केली आहे. तृणमूल कॉंग्रेसने 21 जुलै रोजी शहीद दिन साजरा केला. यावेळी टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी कार्यक्रमास व्हर्च्युअल रूपाने भाषण केले. आपल्या भाषणात ममता म्हणाल्या की, भाजपने देशाला अंधकारात ढकलले आहे, केंद्रातील सत्तेतून त्यांना बेदखल करेपर्यंत आता खेला होबे.
बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी महटले की, भाजपचे काही सदस्य मानवाधिकार संघटनांचे सदस्य आहेत. त्यांनी चुकीचा अहवाल दिला आहे. बंगालमध्ये मतदानानंतर कोणताही हिंसाचार झाला नाही. मतदान करण्यापूर्वी ते आपल्यावर दबाव कसे आणत आहेत हे आम्हाला माहिती आहे. आता भाजपला सत्तेतून बेदखल करत नाहीत तोपर्यंत ‘खेला होबो.’
पक्षाच्या कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की- भाजप पूर्णपणे हुकूमशाहीकडे झुकले आहे, त्रिपुरामधील आमचा कार्यक्रम रोखणत आला आहे. ही लोकशाही आहे का? ते देशातील संस्था नष्ट करत आहेत. आता मोदी सरकारला प्लास्टर करण्याची गरज आहे. आता आपल्याला काम सुरू करावे लागेल.
ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, सरकार पेगाससच्या माध्यमातून हेरगिरी करत आहे. हेरगिरीसाठी पैसे खर्च करतंय. यामध्ये असंख्य मंत्री आणि न्यायाधीश ठेवले जात आहेत, परंतु यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत देशातील लोकांना गंगेमध्ये मृतदेह तरंगताना दिसले आहेत, असा आरोप ममता यांनी केला. ऑक्सिजनच्या अभावामुळे बर्याच लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ऑक्सिजनच्या अभावामुळे एकही मृत्यू झाला नाही असे सरकारचे म्हणणे आहे. ममता म्हणाल्या की, केंद्र फक्त बयानबाजी करत आहे.
mamata Banerjee Takes A Dig At Modi Govt Says Khela Hobe Till BJP Removed from Power
महत्त्वाच्या बातम्या
- CAA-NRC भारताच्या मुस्लिम नागरिकांविरुद्ध नाहीत, सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन
- अमेरिकेन संस्थेचे अजब तर्कट, अवघ्या जगात 41 लाख कोरोना मृत्यू असताना एकट्या भारतात 49 लाख मृत्यू झाल्याचा दावा, कोणी लिहिलाय हा रिपोर्ट? वाचा सविस्तर…
- नवज्योतसिंग सिद्धू यांचा मेगा शो, आमदारांसह गाठले सुवर्ण मंदिर, कॅप्टनची माफी मागण्यास तयार नाहीत
- राज कुंद्राचं पॉर्नचं साम्राज्य : दिवसाला 20 हजार रुपये किरायाने घ्यायचे बंगला, 20 ते 25 वर्षांच्या स्ट्रगलिंग अभिनेत्रींना ओढायचे जाळ्यात
- राज कुंद्रा पॉर्न प्रकरणात पूनम पांडे अन् शर्लिन चोप्राची एंट्री, तर कंगना बॉलीवुडला म्हणाली गटार