• Download App
    CAA-NRC भारताच्या मुस्लिम नागरिकांविरुद्ध नाहीत, सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन । CAA-NRC not against Muslim citizens of India says RSS chief Mohan Bhagwat

    CAA-NRC भारताच्या मुस्लिम नागरिकांविरुद्ध नाहीत, सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

    CAA-NRC : सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी म्हटले की, सीएए-एनआरसीचा भारतातील मुस्लिम नागरिकांशी कोणताही संबंध नाही. गुवाहाटीमध्ये नानी गोपाल महंतांनी लिहिलेल्या ‘Citizenship DEBATE over NRC & CAA Assam & the Politics of History’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना मोहन भागवत म्हणाले की, सीएए आणि एनआरसीबद्दल भारताच्या नागरिकांना काळजी करण्याची गरज नाही. CAA-NRC not against Muslim citizens of India says RSS chief Mohan Bhagwat


    विशेष प्रतिनिधी

    गुवाहाटी : सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी म्हटले की, सीएए-एनआरसीचा भारतातील मुस्लिम नागरिकांशी कोणताही संबंध नाही. गुवाहाटीमध्ये नानी गोपाल महंतांनी लिहिलेल्या ‘Citizenship DEBATE over NRC & CAA Assam & the Politics of History’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना मोहन भागवत म्हणाले की, सीएए आणि एनआरसीबद्दल भारताच्या नागरिकांना काळजी करण्याची गरज नाही.

    ते म्हणाले की, सीएए-एनआरसी हा कोणत्याही भारतीय नागरिकाविरुद्ध केलेला कायदा नाही. सीएएमुळे भारतातील मुस्लिम नागरिकांचे नुकसान होणार नाही. काही लोकांनी राजकीय फायदा घेण्यासाठी हिंदू-मुस्लीम मुद्दा बनविला आहे, हा हिंदू-मुस्लिम मुद्दा नाही.

    मोहन भागवत पुढे म्हणाले की, फाळणीनंतर असे आश्वासन देण्यात आले होते की, प्रत्येक देश आपल्या येथील अल्पसंख्याकांची काळजी घेईल. आम्ही आजपर्यंत त्याचे अनुसरण करत आहोत, परंतु पाकिस्तानने तसे केले नाही. सर्वांनी एक स्वतंत्र देश होईल असे स्वप्न घेऊन इंग्रजांशी लढा दिला. देशाची फाळणी होताना लोकांची संमती घेतली गेली नव्हती.

    … तर फाळणी झाली नसती

    त्यावेळी जनतेची संमती घेतली असती तर देशाचे विभाजन झाले नसते, असेही सरसंघचालक म्हणाले. पण नेत्यांनी हा निर्णय घेतला आणि लोकांनी त्याचा स्वीकार केला. देशाच्या फाळणीच्या निर्णयानंतर ज्या लोकांना बेदखल व्हावे लागले होते, ते लोक आजही बेदखल होत आहेत. त्यांचा दोष काय आहे, कोण काळजी करेल, त्यांच्याबद्दल कोण विचार करेल? त्या लोकांना मदत करणे आपले नैतिक कर्तव्य आहे.

    ते म्हणाले की, आम्हाला कोणत्याही धर्म, भाषा किंवा पंथात कोणतीही अडचण नाही. जेव्हा वर्चस्वाच्या हेतूने एकसमानपणा लादण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा समस्या सुरू होते. पुढच्या पिढीला समस्या देऊ नका, तर संधी सोपवण्यासाठी समस्यांचे निवारण करा.

    हा हिंदू-मुस्लिम मुद्दा नाही

    भागवत म्हणाले की, एनआरसी हा आपल्या देशातील नागरिक कोण आहे हे जाणून घेण्याचा एक मार्ग आहे, हे कोणत्याही विशिष्ट व्यक्तीच्या विरोधात नाही. देशाच्या राजकारणात याचा राजकीय फायद्यानुसार विचार केला जाईल किंवा काही लोक सांप्रदायिकतेचा रंग देतील. ते याला हिंदू-मुस्लिम मुद्दा बनवतात, परंतु हा हिंदू-मुस्लिम मुद्दा नाही. आपल्याला या सर्व गोष्टी पहाव्या लागतील आणि देशाचे राजकारण योग्य दिशेने असले पाहिजे हे देशातील लोकांनी ठरविले आहे.

    CAA-NRC not against Muslim citizens of India says RSS chief Mohan Bhagwat

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    काश्मीरच्या सोपोरमध्ये 2 दहशतवादी ठार, 2 जवान जखमी; 2 दिवसांपासून ऑपरेशन सुरू

    काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिला नाही म्हणून नसीम खानांची नाराजी, पण ओवैसींच्या AIMIM ने केली त्यांची गोची!!

    काँग्रेसला खरं तर अख्ख्या बिल्डिंग रीडेव्हलपमेंटची गरज; पण निदान आता प्लंबर तरी बोलवा!!