मंगळवारी सायंकाळी मुंबईत दाखल झाल्यानंतर सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत.Mamata Banerjee on a two-day tour of Mumbai; Will arrive in Mumbai this evening
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मागील आठवड्यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्ली दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती.दरम्यान आज ( मंगळवारी) सायंकाळी ममता बॅनर्जी दोन दिवसाच्या दौऱ्यासाठी मुंबईत दाखल होणार आहेत.
या दौऱ्यात बॅनर्जी या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटणार असल्याचे समजते. मंगळवारी सायंकाळी मुंबईत दाखल झाल्यानंतर सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत.
तसेच बुधवार १ डिसेंबर रोजी उद्योग जगतातील मान्यवरांशी चर्चा करणार आहेत.या दौऱ्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाच्या स्वागत सोहळ्यालाही उपस्थित राहतील. त्यानंतर रात्री उशिरा मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बुधवारी मुंबईतील उद्योगपतींशी भेटीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतर शरद पवार यांची भेट घेऊन गुरुवारी कोलकात्याला परतणार आहेत.
पुढील वर्षी एप्रिल महिन्यात बंगालमध्ये जागतिक व्यापार परिषद भरविण्यात येणार आहे. या परिषदेत अधिकाधिक उद्योजकांनी सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न करणार आहेत.
Mamata Banerjee on a two-day tour of Mumbai; Will arrive in Mumbai this evening
महत्त्वाच्या बातम्या
- ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांचा राजीनामा, आयआयटी मुंबईचे पराग अग्रवाल नवे सीईओ
- मोदी सरकारच्या काळात वाढला सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवरील विश्वास, केंद्राने आरोग्यावरील खर्च वाढविल्याचा परिणाम
- रामजन्मभूमी खटल्याचा निकाल धर्माच्या नव्हे तर कायदे आणि संविधानाच्या आधारावर, रंजन गोगोई यांनी केले स्पष्ट
- जमीनीवरील राजकारणी, वेदना सहन करत महिला खासदार सायकलवर जाऊन प्रसुतीसाठी झाल्या दाखल
- नव्या वर्षात १२ सुट्या वाया! शनिवार-रविवारी आल्याने होणार कर्मचाऱ्यांचे नुकसान
- सायरस पूनावाला सोडून जगातील सगळ्या धनाड्यांना ओमिक्रॉन कोरोना व्हायरस झटका, अब्जावधी रुपयांचे नुकसान