• Download App
    ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांचा राजीनामा, आयआयटी मुंबईचे पराग अग्रवाल नवे सीईओ|Twitter CEO Jack Dorsey resigns, IIT Mumbai's Parag Agarwal new CEO

    ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांचा राजीनामा, आयआयटी मुंबईचे पराग अग्रवाल नवे सीईओ

    विशेष प्रतिनिधी

    न्यूयॉर्क : ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता पराग अग्रवाल हे ट्विटरचे नवे सीईओ असणार आहेत. गेल्या वषार्पासूनच जॅक डॉर्सी यांनी हे जाहीर केलं होतं की मी लवकरच कंपनी सोडणार आहे. आपल्या पदाचा मी राजीनामा देणार आहे. त्यासंबंधीची प्रक्रिया गेल्या वर्षी पासून सुरू होती.Twitter CEO Jack Dorsey resigns, IIT Mumbai’s Parag Agarwal new CEO

    इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मुंबईचे माजी विद्यार्थी असलेले अग्रवाल यांची 8 मार्च 2018 रोजी ट्विटरचे सीटीओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ट्विटरच्या टाइमलाइनवर ट्विट्सची प्रासंगिकता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावरील त्यांचे संशोधन महत्वाचे मानले जाते.



    स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडी पूर्ण केल्यानंतर अग्रवाल ऑक्टोबर 2011 मध्ये एक सॉफ्टवेअर अभियंता म्हणून ट्विटरवर रुजू झाले. स्टॅनफोर्ड येथे शिकत असताना त्यांनी मायक्रोसॉफ्ट, याहू यासारख्या लॅबसाठी रिसर्च इंटर्न म्हणून काम केले. त्यांनी अणुऊर्जा सेंट्रल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.

    ट्विटरनी फेसबुक आणि टिकटॉक यांच्याशी स्पर्धा कायम ठेवली असून 2023 पर्यंत आपला महसूल दुप्पट करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. त्यासाठी त्यांनी काही नवे उपाय योजले आहेत. ट्विटरने एक पत्र जारी केलं आहे. त्यामध्ये डॉर्सी यांनी म्हटलं आहे की कंपनीत मी अनेक पदांवर जबाबदाऱ्या निभावल्या आहेत. मी आधी को-फाऊंडर म्हणजे सह संस्थापक म्हणूनही काम पाहिलं आहे.

    त्यानंतर चेअरमनही राहिलो आहे. एक्झिक्युटिव्ह चेअरमन आणि शेवटी सीईओ पद अशा जबाबदाऱ्या निभावल्या आहेत. सीईओ म्हणून 16 वर्षे काम केलं आहे. मात्र आता मी हा निर्णय घेतला आहे की आपण थांबायचं. त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. माझा उत्तराधिकारी म्हणून मी पराग अग्रवाल यांना निवडलं आहे ते आता नवे सीईओ असतील असं डॉर्सी यांनी म्हटलं आहे.

    पराग अग्रवाल हे सीईओ म्हणून उत्तम काम करतील असा माझा विश्वास आहे. गेल्या दहा वर्षात त्यांनी केलेली कामगिरी उत्तम आहे त्यामुळे सीईओ म्हणून मी त्यांची निवड केली आहे असंही डॉर्सी यांनी म्हटलं आहे.

    ‘मी नवी जबाबदारी स्वीकारत असताना आपल्याला सगळं जग पाहतं आहे. ही बातमी आल्यानंतर लोक वेगळे विचार प्रदर्शित करणार आहेत. आपल्याला ट्विटरच्या भविष्याची काळजी आहे. आता पूर्ण ताकदीने आपल्या पुढे जायचं आहे. हा एक संकेत आहे की आपण आपल्या कामाचं महत्त्व आहे. ट्विटरची क्षमता आपण जगाला दाखवण्याची वेळ आली आहे.

    Twitter CEO Jack Dorsey resigns, IIT Mumbai’s Parag Agarwal new CEO

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    हेमंत सोरेन यांना पुन्हा धक्का! ED कोर्टाने फेटाळला अंतरिम जामीन

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    ‘ममता बॅनर्जींना अटक करा, अन् ‘TMC’ला दहशतवादी संघटना घोषित करा’