• Download App
    भाजप विरोधात भाषणे करून ममता बॅनर्जी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसताहेत; अधीर रंजन चौधरी यांचे अचूक शरसंधान!! । Mamata Banerjee is stabbing the Congress in the back by making anti-BJP speeches; Adhir Ranjan Chaudhary's perfect Sharasandhan !!

    भाजप विरोधात भाषणे करून ममता बॅनर्जी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसताहेत; अधीर रंजन चौधरी यांचे अचूक शरसंधान!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विरोधकांच्या ऐक्यावर अचूक राजकीय भाष्य केले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या वरवर सर्व विरोधी पक्षांचे ऐक्य साधण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु प्रत्यक्षात त्या काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत, असा गंभीर आरोप अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे आहे. Mamata Banerjee is stabbing the Congress in the back by making anti-BJP speeches; Adhir Ranjan Chaudhary’s perfect Sharasandhan !!

    ममता बॅनर्जी यांच्या राजकीय खेळींवर त्यांनी दीर्घ भाष्य केले आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसच्या सध्याच्या अवस्थेविषयी देखील परखड मते व्यक्त केली आहेत. अधीर रंजन चौधरी म्हणाले, देशात केंद्रातल्या मोदी सरकार विरोधात वातावरण जरूर आहे. परंतु, विरोधी पक्षांनी खऱ्या अर्थाने एकजूट दाखवली पाहिजे. तरच मोदींचा पराभव करता येईल. ममता बॅनर्जी या मोदींच्या विरोधात भाषण जरूर करतात. पण या काँग्रेस पळत आहेत. काँग्रेसच्या काही नेत्यांची त्यांची अजून जवळीक असल्यामुळे त्यांना असे करणे शक्य होत असते. पण एक विसरता कामा नये की ममता बॅनर्जी यांना राजीव गांधी यांनी पुढे आणले होते.



    काँग्रेसच्या विविध पदांवर बसवले होते. आज त्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपायी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत. त्यांना पंतप्रधान व्हायचे आहे. या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा गैर काही नाही परंतु एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करत असताना त्या काँग्रेस पक्ष फोडून प्रत्यक्षात मोदींचे हात बळकट करताना दिसत आहेत, याकडे अधीर रंजन चौधरी यांनी आवर्जून लक्ष वेधले.

    अधीर रंजन चौधरी यांच्या या परखड विश्लेषणात वास्तविकता आहे. कारण ममता बॅनर्जी यांनी अनेक काँग्रेस नेते फोडून आपल्या तृणमूल काँग्रेस मध्ये घेतले आहेत. माजी खासदार सुष्मिता देव, गोव्याचे माजी मुख्यमंत्री दुकानी फालेरो आदी नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. पंजाब मध्ये देखील काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा त्यांचा इरादा आहे. त्या मूळ काँग्रेसलाच काँग्रेस (एम) म्हणजे ममता बॅनर्जी मध्ये रूपांतरित करू इच्छित आहेत. नेमक्या याच शब्दांमध्ये अधीर रंजन चौधरी यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यानिमित्ताने त्यांनी “विरोधी ऐक्याचे ममतांचे प्रयत्न” या विषयाची पोलखोल केली आहे.

    Mamata Banerjee is stabbing the Congress in the back by making anti-BJP speeches; Adhir Ranjan Chaudhary’s perfect Sharasandhan !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी

    Bangladesh : बांगलादेशात हिंदू नेत्याची हत्या, भारताची तीव्र प्रतिक्रिया

    France : भारताने घेतला मोठा निर्णय! फ्रान्सकडून खरेदी करणार जगातील सर्वात धोकादायक 40 लढाऊ जेट्स