• Download App
    ममतांचे मोदींशी डील; भाजपवर तोंडी तोफा डागून काँग्रेस फोडणाऱ्या ममतांविरोधात अधीर रंजन चौधरींचा हल्लाबोल|Mamata Banerjee is helping BJP by opposing Congress. She is becoming a middleman of PM Modi.

    ममतांचे मोदींशी डील; भाजपवर तोंडी तोफा डागून काँग्रेस फोडणाऱ्या ममतांविरोधात अधीर रंजन चौधरींचा हल्लाबोल

    वृत्तसंस्था

    कोलकाता – भाजपवर तोंडी प्रखर हल्लाबोल करीत प्रत्यक्षात काँग्रेस पक्ष फोडण्याचे काम करीत असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी हल्लाबोल केला आहे.Mamata Banerjee is helping BJP by opposing Congress. She is becoming a middleman of PM Modi.

    ममता बॅनर्जी या काँग्रेसच्या विरोधात बोलून भाजपला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकप्रकारे राजकीय मदतच करीत आहेत, असा आरोप अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे. पंतप्रधान मोदींशी ममता बॅनर्जी यांचा “दिल्लीत तुम्ही आणि कोलकात्यात आम्ही”, असा राजकीय समझोता झाला असावा, असा गंभीर आरोप अधीर रंजन यांनी केला आहे.



    ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपचा निर्णायक पराभव केला. पण भाजपला तिथे ७८ आमदार निवडून आणता आले. काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा समझोता असूनही दोघांची टॅली शून्यावर पोहोचली. काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा अक्षरशः सुपडा साफ झाला.

    त्यानंतरही ममता बॅनर्जी थांबल्या नाहीत. त्यांनी आसाममध्ये काँग्रेसच्या माजी खासदार आणि महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सुष्मिता देव आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईजिनो फालेरो यांना काँग्रेसमधून फोडून तृणमूळ काँग्रेसमध्ये घेतले. आता तर गोव्यात २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर चार दिवस मुक्कामाला आहेत.

    या पार्श्वभूमीवर अधीर रंजन चौधरी यांच्या सारखे वरिष्ठ काँग्रेस नेते उघडपणे ममता बॅनर्जी यांच्या विरोधात बोलले आहेत. ममता बॅनर्जी यांचे पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी कालच भाजपला दिल्लीत फक्त तृणमूळ काँग्रेसच हरवू शकते, असे काँग्रेसला डिवचणारे विधान केले होते. त्यांना देखील अधीर रंजन यांनी काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असल्याचे प्रत्युत्तर दिले आहे.

    Mamata Banerjee is helping BJP by opposing Congress. She is becoming a middleman of PM Modi.

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!