Mamata Banerjee : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात झालेल्या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्याला राजकीय वातावरण गरम झाले आहे. शनिवारी कूचबिहारमधील हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाने कोणत्याही नेत्याला तिथे तीन दिवस जाण्यास मनाई केली आहे. यावर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संतापल्या आहेत. निवडणूक आयोगावर टीका करत ममता म्हणाल्या की, निवडणूक आयोगाने आपले नाव बदलून ‘मोदी कोड ऑफ कंडक्ट’ (एमसीसी) केले पाहिजे. आता ममता 14 एप्रिलला कूचबिहारला भेट देतील. Mamata Banerjee criticizes Election Commission for preventing her from going to Cooch Behar
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात झालेल्या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्याला राजकीय वातावरण गरम झाले आहे. शनिवारी कूचबिहारमधील हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाने कोणत्याही नेत्याला तिथे तीन दिवस जाण्यास मनाई केली आहे. यावर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संतापल्या आहेत. निवडणूक आयोगावर टीका करत ममता म्हणाल्या की, निवडणूक आयोगाने आपले नाव बदलून ‘मोदी कोड ऑफ कंडक्ट’ (एमसीसी) केले पाहिजे. आता ममता 14 एप्रिलला कूचबिहारला भेट देतील.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना पीडितांच्या कुटुंबीयांना भेटण्यापासून रोखल्यााचा आरोप केला आहे. ममता बॅनर्जी यांनी रविवारी ट्विट करून निवडणूक आयोग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आपला राग काढला. ममतांनी लिहिले, निवडणूक आयोगाने (ईसी) त्याचे नाव बदलून एमसीसी केले पाहिजे अर्थात ‘मोदी आचारसंहिता’.
ममता यांनी पुढे लिहिले की, भारतीय जनता पक्षाने सर्व शक्ती पणाला लावावी, परंतु या जगातील कोणीही मला लोकांचे दु:ख वाटून घेण्यापासून अडवू शकत नाही. कुचबिहारमध्ये माझ्या बंधू-भगिनींना भेटण्यापासून तुम्ही तीन दिवस थांबवू शकतात, परंतु चौथ्या दिवशी मी तिथे जाणारच असल्याचे ममतांनी सांगितले. मी 14 एप्रिल रोजी पीडितांच्या कुटुंबाला भेटेल, कोणीही मला रोखू शकणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
काय प्रकरण आहे?
शनिवारी बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या चौथ्या टप्प्यात कूचबिहारच्या सितालकुची येथे चार जणांचा मृत्यू झाला. यानंतर तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता निवडणूक आयोगाने कोणत्याही नेत्याच्या प्रवेशास 72 तास बंदी घातली. एवढेच नव्हे, तर पुढील टप्प्यात म्हणजेच पाचव्या फेरीच्या मतदानाच्या 72 तास आधी प्रचार थांबवण्याचे फर्मानही आयोगाने जारी केले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे ममता बॅनर्जी खूपच संतप्त झाल्या आहेत.
Mamata Banerjee criticizes Election Commission for preventing her from going to Cooch Behar
महत्त्वाच्या बातम्या
- NIA Antilia Case : पोलीस अधिकारी रियाझ काझींना अटक, अँटिलया प्रकरणात सचिन वाझेंना मदत केल्याचा आरोप
- ‘लस उत्सवा’निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशवासीयांना 4 आवाहने, वाचा सविस्तर…
- WATCH : पाच हजारांत सुरू करा नवा बिझनेस, महिन्याला होईल एवढी कमाई
- महाराष्ट्रात सर्वाधिक लस पुरवठा ; लोकसंख्येनुसार उत्तर प्रदेशला सर्वाधिक लस मिळायला हवी होती ; हर्षवर्धन यांचे खणखणीत उत्तर
- भ्रष्टाचारप्रकरणी CBI अॅक्शन मोडमध्ये, अनिल देशमुखांच्या दोन स्वीय सहायकांना समन्स