• Download App
    न्यायाधीशांवर आक्षेपार्ह टिप्पणी करणे अभिनेत्याला पडले महागात; पोलिसांनी आवळल्या मुसक्या|Making offensive remarks to judges cost the actor dearly; The police caught a glimpse

    न्यायाधीशांवर आक्षेपार्ह टिप्पणी करणे अभिनेत्याला पडले महागात; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

    वृत्तसंस्था

    बंगळूर: कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर आक्षेपार्ह टिप्पणी करणे एका अभिनेत्याला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली.Making offensive remarks to judges cost the actor dearly; The police caught a glimpse

    हिजाब प्रकरणावर कर्नाटक उच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी पार पडली. तेव्हा न्यायाधीशांवर आक्षेपार्ह ट्वीट केल्याने कन्नड अभिनेता चेतन कुमार अहिम्साला अटक झाली आहे. त्याला मंगळवारी बेंगळुरू पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर आयपीसीच्या ५०५(२) आणि ५०४ अन्वये एफआयआर नोंदवण्यात आला आहे.



    मध्य विभागाचे पोलीस उपायुक्त एम एन अनुचेथ यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरुद्ध केलेल्या ट्वीटच्या आधारे शेषाद्रिपुरम ठाण्यात चेतनविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. अभिनेता चेतन कुमारने कर्नाटकचे विद्यमान सरन्यायाधीश कृष्णा दीक्षित यांच्याशी संबंधित एका जुन्या खटल्याच्या संदर्भात ट्वीट केले होते. आपल्या ट्विटमध्ये अभिनेता चेतन कुमारने कृष्णा दीक्षित यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणीसह बलात्कार प्रकरणात त्यांनी दिलेल्या उच्च न्यायालयाच्या आदेशावर आक्षेप घेतला होता.

    Making offensive remarks to judges cost the actor dearly; The police caught a glimpse

    Related posts

    हेमंत सोरेन यांना पुन्हा धक्का! ED कोर्टाने फेटाळला अंतरिम जामीन

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    ‘ममता बॅनर्जींना अटक करा, अन् ‘TMC’ला दहशतवादी संघटना घोषित करा’