वृत्तसंस्था
मुंबई : दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने देशभराटी पाकपुरस्कृत दहशतवादी घातपात घडवून आणणारे मॉड्यूल उद्ध्वस्त केले. त्यामध्ये अटक करण्यात आलेल्या सहापैकी एक मुंबईतील धारावीत राहणार जान महंमद हा दहशतवादी निघाल्याने महाराष्ट्र एटीएस जागी झाली. तेव्हापासून एटीएसने या प्रकरणाचा शोध सुरु केला. त्यानुसार एटीएसने शुक्रवारी रात्री या गटातील सातवा दहशतवादी झाकीर याला जोगेश्वरी येथून अटक केली. Maharashtra ATS Active; Seventh terrorist arrested from Jogeshwari in Mumbai; Railway tracks, flyovers were on target
झाकिरचे आणि दिल्ली पोलिसांनी अटक केल्या सहा दहशतवाद्यांचे एकमेकांसोबत संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसारच महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिसांनी झाकिरला ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेला दहशतवादी जान मोहम्मद याने झाकिरला मुंबईत स्फोटके आणि इतर शस्त्रे आणण्यास सांगितले होते अशी माहिती एटीएसने दिली आहे.
रेल्वे ट्रॅक आणि उड्डाणपूल होते टार्गेट!
दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर शहरातील मुख्य उड्डाणपूल आणि रेल्वे रूळ होते, अशी धक्कादायक माहिती अटक करण्यात आलेल्या आतंकवाद्याच्या तपासात समोर आली आहे. पाकिस्तान स्थित आयएसआय संघटनेच्या आदेशावरून या दहशतवाद्यांना मुंबई तसेच देशातील इतर शहरामध्ये मोठा घातपात घडवून आणायचा होता. यासाठी सहा अतिरेक्यांपैकी दोघांना या प्रकारचे प्रशिक्षण देखील देण्यात आले होते, अशी माहिती अटक करण्यात आलेल्या अतिरेक्यांच्या चौकशीत उघडकीस आली आहे.
Maharashtra ATS Active; Seventh terrorist arrested from Jogeshwari in Mumbai; Railway tracks, flyovers were on target
महत्त्वाच्या बातम्या
- शशी थरुरना गाढव म्हटल्याबद्दल तेलंगण काँग्रेस प्रदेशाध्यक्षाकडून माफी
- काश्मिरी पंडितांचे काश्मीर खोऱ्यात पुनर्वसन करण्यासाठी मोदी सरकारचे महत्त्वाचे पाऊल
- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली चार धाम यात्रा आजपासून सुरु
- India Vaccination : कोरोना लसीकरणात भारताने मोडला चीनचा ऐतिहासिक विक्रम, रात्री साडे नऊपर्यंत 2.25 कोटी डोस दिले