• Download App
    LPG Cylinder Price : LPG सिलेंडर 100 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या काय आहेत दिल्ली ते मुंबईचे नवे दर?|LPG Cylinder Price LPG cylinder cheaper by 100 rupees, know what are the new rates from Delhi to Mumbai?

    LPG Cylinder Price : LPG सिलेंडर 100 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या काय आहेत दिल्ली ते मुंबईचे नवे दर?

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशातील महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा मिळाला आहे. 1 सप्टेंबरपासून गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात 100 रुपयांनी मोठी कपात करण्यात आली आहे. मात्र, ही दरकपात केवळ व्यावसायिक सिलिंडरवरच झाली आहे. तर 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर जुन्या किमतीतच उपलब्ध आहे.LPG Cylinder Price LPG cylinder cheaper by 100 rupees, know what are the new rates from Delhi to Mumbai?

    1 सप्टेंबरपासून दिल्लीत 1 इंडेनच्या 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमती 91.50 रुपयांनी, कोलकात्यात 100 रुपयांनी, मुंबईत 92.50 रुपयांनी, चेन्नईमध्ये 96 रुपयांनी स्वस्त होतील. व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी झाल्याचा फायदा देशाच्या कानाकोपऱ्यात मिळणार आहे.



    सिलिंडरची किंमत कुठे किती?

    आजपासून दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 1976.50 ऐवजी 1885 रुपये होईल. त्याच वेळी, आता कोलकातामध्ये किंमती 1995.5 रुपयांपर्यंत खाली आल्या आहेत. तर आधी ते 2095 रुपये होते. मुंबईत सिलेंडरची किंमत 1844 रुपयांवर आली आहे.

    6 जुलैपासून घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल नाही

    6 जुलैपासून घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच सिलिंडर अजूनही त्याच किमतीत मिळत आहे. इंडेन सिलिंडरची किंमत दिल्लीत 1053 रुपये असेल, तर कोलकात्यात 1079 रुपये, मुंबईत 1052 रुपये, चेन्नईमध्ये 1068 रुपये असेल.

    १ ऑगस्टलाही कमी झाल्या किमती

    गॅस कंपन्या दर महिन्याच्या १ तारखेला सिलिंडरची किंमत ठरवतात. यापूर्वी ऑगस्टमध्येही सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. त्यावेळी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ३६ रुपयांची कपात करण्यात आली होती. दिल्लीत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत आधी 2012.50 पैसे होती, या कपातीनंतर किंमत 1976.50 रुपये झाली.

    LPG Cylinder Price LPG cylinder cheaper by 100 rupees, know what are the new rates from Delhi to Mumbai?

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    काश्मीरच्या सोपोरमध्ये 2 दहशतवादी ठार, 2 जवान जखमी; 2 दिवसांपासून ऑपरेशन सुरू

    काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिला नाही म्हणून नसीम खानांची नाराजी, पण ओवैसींच्या AIMIM ने केली त्यांची गोची!!

    काँग्रेसला खरं तर अख्ख्या बिल्डिंग रीडेव्हलपमेंटची गरज; पण निदान आता प्लंबर तरी बोलवा!!