विशेष प्रतिनिधी
वायनाड : Rahul Gandhi राजकारणात म्हणे प्रेमाला महत्त्व; पण राहुल गांधींनी टी-शर्टच्या छातीवर नव्हे तर पाठीवर लिहिले, “आय लव्ह वायनाड शब्द!!Rahul Gandhi
राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकले होते, पण त्याचवेळी त्यांनी अमेठीतून देखील विजय मिळवला म्हणून त्यांना संकट काळात साथ दिलेल्या वायनाडची साथ राहुल गांधींनी सोडली. तिथून त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. आता तिचे पोटनिवडणुकीमध्ये प्रियांका गांधींना उभे केले. त्यांचा प्रचार स्वतः राहुल गांधी वायनाड मतदारसंघात फिरून करत आहेत.
अशाच प्रचारादरम्यान त्यांनी एका रोड शो मध्ये राजकारणातल्या प्रेमावर भाषण केले. भारत जोडो यात्रेच्या दरम्यान मी संपूर्ण देशभर फिरलो. शक्यतो राजकारणात कोणी प्रेमाची भाषा बोलत नाही, पण वायनाडने मला प्रेमाची भाषा शिकवली. त्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी “मोहब्बत की दुकान” हे शब्द वापरले. इथे सुद्धा मी वायनाड वर प्रेम करायलाच आलो आहे, असे सांगून त्यांनी श्रोत्यांकडे पाठवली त्यावेळी त्यांच्या टी-शर्टच्या पाठीवर हार्टचा इमोजी आणि “आय लव्ह वायनाड” असे लिहिलेले दिसले.
राहुल गांधींनी लोकसभेची अमेठीची सीट स्वतःकडे ठेवून वायनाडच्या सीट वरून राजीनामा दिला. त्या पाठोपाठ टी-शर्टच्या छातीवर नव्हे, तर पाठीवर “आय लव्ह वायनाड” असे लिहून वायनाडचा “निरोप” घेतला.
Love is important in politics; But Rahul Gandhi wrote the words “I love Wayanad” not on the chest of the T-shirt, but on the back!!
महत्वाच्या बातम्या
- Baba Siddiqui बाबा सिद्दीकी हत्याकांडातील मुख्य आरोपी अटक ; अवघ्या 10 लाख रुपयांसाठी खून
- Jagannath Chattopadhyay बंगालमध्ये ४२ वर्षांची सत्ता असूनही काँग्रेसचे नाव मिटले गेले – जगन्नाथ चट्टोपाध्याय
- BJP Manifesto भाजपचा जाहीरनामा- शेतकऱ्यांची कर्जमाफी, 25 लाख नव्या नोकऱ्या; महिलांना दरमहा 2100 रुपये देणार
- Bangladesh बांगलादेशात ट्रम्प यांचा विजय साजरा करणे समर्थकांना महागात पडले!