Wayanad : वायनाडमध्ये भूस्खलन, 3 मृत्यू; बोगद्याच्या मातीत वाहून आले टँकर-वाहने; अनेकजण दबले; 2024 मध्ये 400 मृत्यू झाले होते
केरळमधील वायनाडमध्ये मंगळवारी सकाळी मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले. या दुर्घटनेत 3 लोकांचा मृत्यू झाला असून, 8 जण जखमी झाले आहेत. अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले असल्याची माहिती आहे. ही दुर्घटना कल्लाडी येथील मीनाक्षी पुलाजवळ घडली.