• Download App
    कॅप्टनसाहेब हे पाहा, ठरवा शेतकरी विरोधी कोण? पंजाब की हरियाणा? मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे कॅ.अमरिंदर सिंग यांना आव्हान|Look, Captain, decide who is anti-farmer? Punjab or Haryana? Chief Minister Manoharlal Khattar's challenge to Amarinder Singh

    कॅप्टनसाहेब हे पाहा, ठरवा शेतकरी विरोधी कोण? पंजाब की हरियाणा? मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे कॅ.अमरिंदर सिंग यांना आव्हान

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : हरियाणा सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक गोष्टी केल्या आहेत. पंजाबमध्ये त्यातील एकही झालेली नाही. हरियाणा सरकारची कामगिरी पाहा आणि मग ठरवा शेतकरी विरोधी कोण आहे, असा सवाल हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांना केला आहे.Look, Captain, decide who is anti-farmer? Punjab or Haryana? Chief Minister Manoharlal Khattar’s challenge to Amarinder Singh

    मनोहरलाल खट्टर यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून कॅ. अमरिंदर सिंग यांना सवाल केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, हरियाणा सरकार किमान आधारभूत किंमत (एमएसपी) देऊन भात, गहू, मोहरी, बाजरी, हरभरा, मूग, मका, भुईमूग, सूर्यफूल आणि कापूस या दहा पिकांची खरेदी करते. एमएसपीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करते.



    एमएसपीवर पंजाब शेतकऱ्यांकडून किती पिके खरेदी करतो? भात लागवडीपासून दूर जाऊ इच्छिणाऱ्यां प्रत्येक शेतकऱ्यांना हरियाणा सात हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देते. पंजाब सरकार किती देते? आय फॉर्म मंजुरीपासून पैसे देण्यास ७२ तासांपेक्षा अधिक विलंब झाल्यास हरियाणा शेतकऱ्याला १२% व्याज देते.

    विलंबाने भरणा केल्यावर पंजाब व्याज देते का? हरयाणा तांदळाचे थेट बीज वापरणाºया शेतकºयाला प्रति एकर ५000 रुपये प्रोत्साहन देते. पंजाब काय प्रोत्साहन देतो? हरयाना प्रत्येक शेतकऱ्याला एकरी एक हजार रुपये खत व्यवस्थापनासाठी देते आणि धानाच्या पेंढा विक्रीसाठी देते. पंजाब शेतकºयाला कोणते प्रोत्साहन देतो? हरयाणा गेल्या ७ वर्षांपासून आपल्या शेतकऱ्यांना उसासाठी देशातील सर्वाधिक एमएसपी देत आहे.

    शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर पंजाबला हरियाणाप्रमाणे भाव देण्याची गरज वाटली आहे का? हरयाना शेतकऱ्यांना बागायती उत्पादन वाढवण्यास मदत करते. भावांतर भरपाई योजना सुरू करून शेतकऱ्याला हमी भाव दिला आहे. पंजाब आपल्या बागायती शेतकऱ्यांना कोणते प्रोत्साहन देते? हरियानाने पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ८५% अनुदानासह शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सूक्ष्म सिंचन योजना सुरू केली आहे.

    पंजाब काय प्रोत्साहन पुरवतो आणि जलदगतीने कमी होत जाणाऱ्या पाण्याच्या उपलब्धतेबाबत शेतकºयांच्या चिंतेवर काही उपाययोजना केली आहे का? आता शेतकरी विरोधी कोण आहे, कॅप्टन साब? पंजाब की हरियाणा? असा सवालही खट्टर यांनी केला आहे.

    Look, Captain, decide who is anti-farmer? Punjab or Haryana? Chief Minister Manoharlal Khattar’s challenge to Amarinder Singh

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!