१० ऑक्टोबरपर्यंत ईडीच्या कोठडीत राहणार
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मद्य घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेले आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना गुरुवारी राऊस अॅव्हेन्यू न्यायालयात हजर केले. सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांना ५ दिवसांच्या ईडी कोठडीत पाठवले आहे. आता संजय सिंह १०ऑक्टोबरपर्यंत ईडीच्या कोठडीत राहणार आहेत. Liquor Scam Case MP Sanjay Singh sent to ED custody for five days
ईडीने कोर्टाकडे संजय सिंह यांना 10 दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती, त्याला संजय सिंह यांच्या वकिलाने विरोध केला आहे. संजय सिंह यांचे वकील मोहित माथूर म्हणाले की, त्यांना कोणत्या आधारावर अटक करण्यात आली आहे, हे सांगितले पाहिजे. यावर ईडीच्या वकिलाने सांगितले की, दोन व्यवहार झाले आहेत, जे वेगळे आहेत आणि एकूण व्यवहार दोन कोटी रुपयांचा आहे. डिजिटल पुरावे आणि काही लोकांसह संजय सिंह यांची समोरासमोर चौकशी करावी लागेल. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला.
यानंतर राऊस एव्हेन्यू कोर्टाने संजय सिंह यांना दिल्ली मद्य धोरण प्रकरणात ईडीच्या कोठडीत पाठवले. न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची कोठडी सुनावली आहे. आता ते १० ऑक्टोबरपर्यंत ईडीच्या कोठडीत राहणार आहे. यावेळी तपास यंत्रणेचे पथक दिल्ली मद्य घोटाळ्यात त्यांची चौकशी करणार आहे. ईडीने बुधवारी अचानक संजय सिंह यांच्या निवासस्थानी छापा टाकला आणि त्यानंतर जवळपास १० तास त्यांची चौकशी केली. यानंतर तपास यंत्रणेने त्यांना ताब्यात घेऊन आज न्यायालयात हजर केले होते.
Liquor Scam Case MP Sanjay Singh sent to ED custody for five days
महत्वाच्या बातम्या
- सुपरस्टार राम चरण याच्या 41 दिवसाच्या व्रताची सांगता!
- पालकमंत्री पद मिळवून अजितदादांनी शिंदे गटावर मात केल्याची बातमी; पण दादांना राजकीय किंमत करावी लागणार चुकती!!
- आशियाई क्रीडा स्पर्धेत ७१ पदकं जिंकून भारताने स्वतःचाच विक्रम मोडत रचला इतिहास
- जम्मू काश्मीर : कुलगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार