• Download App
    लालूंचे काँग्रेसवर टीकास्त्र; तरीही सोनिया फोनवर लालूंशी बोलल्या!! । Lalu's criticism of Congress; Still Sonia talked to Lalu on the phone !!

    लालूंचे काँग्रेसवर टीकास्त्र; तरीही सोनिया फोनवर लालूंशी बोलल्या!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि चारा घोटाळ्यातील शिक्षा भोगत असलेले आरोपी लालूप्रसाद प्रसाद यादव पुन्हा एकदा बिहारमधील राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊ पाहत आहेत. त्यांनी कालच काँग्रेसच्या बिहारमधील अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करत टीकास्त्र सोडले होते. बिहार मधल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने स्वतंत्र भूमिका घेतल्या बरोबर लालूप्रसाद यादव चिडले आणि त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भक्त चरण दास यांच्या विषयी अनुदार उद्गार काढले. काँग्रेसला महागठबंधन मध्ये आम्ही हरण्यासाठीच जागा सोडत असतो. आत्तापर्यंत महागठबंधनला काँग्रेसने कधी जिंकून दिले आहे का?, असा खोचक सवाल लालूप्रसाद यांनी केला आहे. Lalu’s criticism of Congress; Still Sonia talked to Lalu on the phone !!



    एवढे होऊन देखील काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काल लालूप्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून बातचीत केली. सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस यांची आणि राज्याच्या प्रभारी यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी लालूप्रसाद यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली.

    बिहार मधील काँग्रेस लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी फारकत घेऊन बिहारमध्ये आपले स्वतंत्र अस्तित्व ठळक करू इच्छित आहे. परंतु त्याच वेळी सोनिया गांधी मात्र लालूप्रसाद यादव यांच्याशी जुळवून घेण्याचे संकेत देत आहेत. सोनिया गांधी यांच्या फोन च्या निमित्ताने काँग्रेस पक्षातल्या धोरणातील ही विसंगती समोर आली आहे.

    Lalu’s criticism of Congress; Still Sonia talked to Lalu on the phone !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती