विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात महायुतीचे देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत बदल केल्याच्या सोशल मीडियात अफवा पसरल्या आहेत. त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. योजनेच्या निकषांमध्ये कुठलेही बदल केलेले नाहीत, असा स्पष्ट खुलासा महिला आणि बाल कल्याण विभागाने केला आहे. Ladki Bahin Yojna fake narative
माजी मंत्री आणि आमदार आदिती तटकरे यांनी ट्विटर वर हा खुलासा प्रसृत केला असून अफवांवर विश्वास न ठेवायचे आवाहन केले आहे.
आदिती तटकरे यांचे ट्विट असे :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल रिल्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून प्रसारित करण्यात आली आहे. एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून याबाबतीत मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे. तरी, याबाबत समाज माध्यमांतून होणाऱ्या अपप्रचारास कोणीही बळी पडू नये ही नम्र विनंती.
Ladki Bahin Yojna fake narative
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis : पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन
- Bangladesh : बांगलादेशातल्या हिंदूंवरच्या अत्याचाराबाबत मानवाधिकारवाले मूग गिळून गप्प का??
- vishwakarma scheme : केंद्राच्या विश्वकर्मा योजनेपासून लाखो तमिळ युवकांना वंचित ठेवण्याचे तामिळनाडूच्या द्रमुक सरकारचे कारस्थान!
- Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशातील कुल्ली येथे भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली